आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:4 सुरक्षा रक्षक पॉझिटिव्ह निघाल्यानंतरही टेस्टसाठी तयार नाही रेखा, सॅनिटाइज करणा-या टीमलाही घरात येण्यापासून रोखले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी शनिवारी आली होती.
  • त्यानंतर बीएमसीने कारवाई करुन बंगला सील केला आणि परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या परिसरातील अन्य चार बंगल्यांच्या वॉचमॅनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहे. यानंतर या सर्वांना बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) च्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. हे लोक दररोज एकमेकांना भेटायचे, त्यामुळे त्यांना संसर्ग झाला, असे सांगितले जात आहे. दरम्यान, रेखा यांनी कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार दिला असून स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे.

रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यासह, त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील इतर चार कर्मचा्यांची कोरोना टेस्ट केली जाणार होती, पण बीएमसीची टीम जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा कोणीही दार उघडले नाही.

  • मीडिया रिपोर्ट्समध्ये सुरू असलेल्या बातम्या

एका वृत्तवाहिनीनुसार, जेव्हा बीएमसीच्या पथकाने बंगल्याचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून रेखा यांच्या मॅनेजरने त्यांच्या येण्याचे कारण विचारले. जेव्हा टीमने सांगितले की ते त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यासाठी आले आहेत, तेव्हा फरजाना म्हणाल्या की, तुम्ही माझा नंबर घ्या आणि आपण याबद्दल नंतर बोलू.

  • मॅनेजर म्हणाल्या  - रेखा अगदी फिट आहेत

बीएमसीच्या पश्चिम वॉर्डचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फुडे यांनी जेव्हा फरजाना यांना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की रेखा अगदी फिट आहेत आणि त्यांची प्रकृतीदेखील उत्तम आहे. त्या स्वतःची कामे उत्तम प्रकारे करीत आहे. फरजाना यांनी सांगितले की, याकाळात रेखा कोणाशीही संपर्कात आल्या नाहीत, म्हणून त्या चाचणी करु इच्छित नाहीत, अशी माहिती फरजाना यांनी संजय फुडे यांना दिली.

  • सॅनिटाइज करण्यासाठीही दार उघडले नाही

त्यानंतर बीएमसीने रेखा यांचे घर सॅनिटाइज करण्यासाठी एक नवीन टीम पाठवली. त्यांनी घराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळीही कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या केबिनसह घराच्या बाहेरील आणि त्याच्या अवतीभोवतीचा भाग सॅनिटाइज करुन ही टीम परत आली.

  • कोरोना चाचणी करुन घेणे महत्वाचे आहे

रिपोर्टनुसार, बीएमसी अधिका-याने सांगितले की, रेखा घराबाहेर जात नाही आणि कोणाशीही भेटत नाही, परंतु खबरदारी घेण्यास काहीच हरकत नाही. त्यांच्यासाठी कोविड -19 ची टेस्ट करुण घेणे फार महत्वाचे आहे, कारण ते कायद्यांतर्गत आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे अनिवार्य आहे.

  • वांद्र्यात आहे रेखा यांचा बंगला  

रेखा यांचा बंगला 'सी-स्प्रिंग्स' वांद्रेच्या बॅण्ड स्टँड भागात आहे. बंगल्याबाहेर दोन सुरक्षा रक्षक नेहमी तैनात असतात. यातील एका रक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही बातमी समजल्यानंतर बीएमसीने बंगला सील करून तो कंटेन्मेंट झोन बनवला.