आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंगला बळी:मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसल्या रेखा, रात्री काळा गॉगल घातल्याने झाल्या ट्रोल; नेटकरी म्हणाले- त्या काहीतरी लपवत आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

68 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री रेखा त्यांच्या फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेत असतात. अलीकडेच त्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या मुंबईतील घराबाहेर दिसल्या. मनीषसोबतचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी त्या 90 च्या दशकातील त्यांच्या आयकॉनिक जिप्सी हेड रॅप लूकमध्ये दिसल्या. गोल्डन आउटफिटसोबत त्यांनी काळा गॉगलही घातला होता. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांना रेखा यांची ही स्टाइल आवडली नाही.

मॅनेजर फरजाना होती सोबत
रेखा यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांची पर्सनल मॅनेजर फरजानाही त्यांच्यासोबत दिसत आहे. यादरम्यान रेखा आणि मनीष यांनी पापाराझींना पोजही दिली.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला की, 'त्यांनी रात्रीच्या वेळी गॉगल का घातला असावा?', तर दुसऱ्या यूजरने 'रेखा काहीतरी लपवत आहेत,' अशी कमेंट केली. तर आणखी एकाने त्यांच्या लूकवर प्रश्न उपस्थित करत 'हा असा कसा लूक आहे?' असे म्हटले आहे.