आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा चित्रपटांवर परिणाम:'अवतार-2'सह हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या, आता डिसेंबर 2022 मध्ये येईल 'अवतार-2'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम 2009 मध्ये आलेल्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपट 'अवतार'च्या सीक्वलसह अनेक चित्रपटांच्या रिलीजवर पडला आहे. डिज्नी स्टूडियोने नुकतंच घोषणा कोरोनामुळे 'अवतार' आणि 'स्टार वार्स'सारख्या चित्रपटांच्या सीक्वल्सलसह डिज्नी स्टूडिओचा 'मुलान'च्या रिलीजलाही पुढे ढकलले आहे.

डिज्नीने सांगिल्यानुसार, 'अवतार-2' आता डिसेंबर 2021 ऐवजी डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होईल, तसेच 'स्टार वार्स'चा दहावा सीक्वल डिसेंबर 2022 ऐवडी डिसेंबर 2023 मध्ये येईल. यासोबतच 'अवतार'चे इतर सीक्वल्स आता 2024, 2026 आणि 2028 मध्ये तर 'स्टार वार्स'चे 2025 आणि 2027 मध्ये रिलीज होतील.

अवतारचे इतर सीक्वल्सही एक-दोन वर्षांच्या अंतराने डिसेंबरमध्ये रिलीज होणार होते. याबाबत अवतारचे दिग्दर्शक कॅमेरुनने रिलीजला उशीर होत असल्याचे पत्र ट्विटरवर जारी केले. यात म्हटले की, चित्रपटाच्या व्हर्चुअल प्रोडक्शन वर्कवर कोरोनाचा परिणाम पडत आहे, यामुळे चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे.

डिज्नीचा बिग बजेट 'मुलान'ची रिलीज डेट यापूर्वी दोनवेळा टाळण्यात आली आहे. चित्रपट 21 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे आता या चित्रपटाला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.