आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्यावर अडकला:हृतिक-अक्षयसोबत चित्रपट सुरू करण्यासाठी दीड वर्षापासून रिलायन्सची धडपड, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली मुख्य भूमिका

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाबराेबरच आणखी 7 मेगाबजेट चित्रपट करण्यावर लक्ष केंद्रित करणार रिलायन्स एंटरटेन्मेंट

कोरोनामुळे सिनेमा उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. मात्र काही मोठ्या स्टुडिओजने अजून हिंमत सोडली नाही. ते मोठी गुंतवणूक करण्यासही तयार आहेत. रिलायन्स एंटरटेन्मेंट भारत पाक युद्धावर आधारित चित्रपटाबरोबरच सात आणखी मेगाबजेटचे चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, कोराेनामुळे गुंतवणुकीवर इतका फरक पडला नाही. क्रू मेंबर्सचे लसीकरण झाल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सामान्य दिवसाप्रमाणे केले जाईल.

कलाकारांना विचारणा करण्याआधीच कोरोना पसरला
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका खास मुलाखतीत सांगितले की, भारत-पाक युद्धावर आधारित हा चित्रपट निर्माते मोठ्या पातळीवर बनवणार होते. सर्जिकल स्ट्राइक आणि आर्टिकल 370 काढल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व मुद्द्यांवर कोवर्ट अॅक्शन करताना एक कथा तयार करण्यात आली होती. रिलायन्स हा सिनेमा हृतिक रोशन किंवा अक्षय कुमारसोबत बनवण्याची योजना करत होती. कंपनी दोन्ही ताऱ्यांना यासाठी विचारणा करणार होती मात्र तोपर्यंत कोरोना संक्रमण पसरले. आता निर्माते गेल्या दीड वर्षापासून परिस्थिती निवळल्याची वाट पाहत आहेत. या सिनेमासोबत कंपनी आणखी ७ मोठ्या प्रकल्पांवर काम करणार आहे.

एका कथेत असतील अनेक कथा
मुख्य पात्र अजित डोभल सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ध्यानात ठेवून बनवले जात आहे. चित्रपट ‘एक था टायगर’ सारखा नव्हे तर ‘बजरंगी भाईजान’ सारखा बनवण्यात येणार आहे. यात लार्जर दॅन लाइफ पात्राबरोरबच इतर कथादेखील दाखवण्यात येतील. यापूर्वी कंपनीने हृतिकसोबत 'सुपर 30’ आणि अक्षयसोबत 'सूर्यवंशी’मध्ये काम केले आहे.

7 आगामी चित्रपटांत असू शकतो यांचा समावेश

  • गुडबाय - अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना
  • चाणक्य - अजय देवगण
  • सर्कस - रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस
  • गोलमाल 5 - अजय देवगण, रोहित शेट्टी
  • कॅथी रिमेक - अजय
बातम्या आणखी आहेत...