आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषी कपूर यांची पहिली पुण्यतिथी:पद्मिनी कोल्हापुरेंनी दिला ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा, म्हणाल्या- ऋषीजींना चापट मारण्याचे दृश्य माझ्यासाठी खूपच अवघड हाेते

किरण जैन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सहकलाकार पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितल्या आठवणी...

आज (30 एप्रिल) सिनेसृष्टीत आपले खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 'प्रेम रोग', 'जमाने को दिखना है', 'प्यार में काबिल' अशा अनेक चित्रपटांत ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करणा-या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये काय म्हणाल्या पद्मिनी कोल्हापुरे जाणून घेऊया...

'बालपणापासूनच होती चाहती'
पद्मिनी कोल्हापुरे सांगतात, 'मी बालपणापासून ऋषीजींची चाहती हाेते. स्कूल बंक करून मी त्यांचे चित्रपट पाहायला जात होते. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते. मी बालपणापासून काम करत आले आहे. त्यांनी मला 'इंसाफ का तराजू’च्या सेटवर पाहिले होते. त्यानंतर त्यांनी नासिरजींकडे माझी शिफारस केली होती. ऋषीजी त्या काळात सुपरस्टार हाेते. पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी खूप घाबरले होते. माझा पहिला शॉट त्यांच्यासोबत एका गाण्याचा होता. मात्र त्यांनी ज्याप्रकारे मला समजावून सांगितले, ते कमालीचे होते. अशा प्रकारे आमच्या चित्रपटाचा क्रम सुरू झाला.'

'ऋषीजींना चापट मारण्याचे दृश्य माझ्यासाठी खूप अवघड होते'
पद्मिनी पुढे सांगतात, 'प्रेम रोगच्या एका दृश्यात मला ऋषीजींना चापट मारायची हाेती, ते दृश्य माझ्यासाठी खूपच अवघड होते. इतक्या मोठ्या स्टारला चापट कशी मारावी, हाच विचार करत होते. तेव्हा खूप घाबरलेही होते. सुमारे आठ टेेक दिल्यानंतर तो सीन ओके झाला. मात्र तोपर्यंत ऋषीजींचा चेहरा लाल झाला होता.'

'सोबत चित्रपट प्लान करत होतो'
शेवटच्या भेटीविषयी पद्मिनी सांगतात, 'तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. आमची शेवटची भेट दिल्ली विमानतळावर झाली होती. त्या वेळी ते चांगले हसून बोलले. तेव्हा ते आजारी असल्याचे वाटले नाही. त्या वेळी आम्ही एक चित्रपट सोबत करण्याचा विचार करत होतो. मात्र आमची ही इच्छा अपूर्णच राहिली. त्यांचे अशा प्रकारे जाणे सर्वांना चटका लावून गेले.'

बातम्या आणखी आहेत...