आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमो डिसूझाचे दुःख:'ABCD' फेम दिग्दर्शक रेमो डिसूझा म्हणाला - माझ्या काळ्या रंगामुळे लोक माझ्यावर विनोद करायचे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमोने सांगितले - अगदी लहान वयातच मला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला होता.

बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. रेमोने सांगितल्यानुसार, लहान वयापासूनच त्याला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला होता. देशपरदेशात त्याला याचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत रेमोने सांगितले की, तो याकडे कायम दुर्लक्ष करत आला. मात्र आता या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतोय. याविरोधात उभे राहू शकलो नाही, याची खंत त्याला वाटते.

रेमोने सांगितले - काळ्या रंगामुळे लोक विनोद करायचे
रेमोने सांगितले, 'अगदी लहान वयातच मला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला होता. लोक माझ्या रंगावर भाष्य करायचे आणि माझ्या रंगावर विनोदही करायचे. मात्र, मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र मोठे झाल्यानंतर हे चुकीचे आहे, हे माझ्या लक्षात आले. मात्र त्याहूनही चुकीचे हे होते की, मी त्या लोकांना तसे करु दिले. मात्र आता मी याविरोधात उभा आहे आणि यापुढे कुणालाही माझ्या रंगावरुन मला नाव ठेऊ देणार नाही. पण आजही आपल्या देशात वर्णद्वेष होतो हे एक वास्तव्य आहे,' असे रेमो म्हणाला.

कोरिओग्राफरसोबत दिग्दर्शक आहे रेमो
रेमो डिसूझाचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव हे त्याचे खरे नाव आहे. त्याच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझाने गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. ध्रुव आणि गबिरिल ही त्याच्या मुलांची नावे आहेत.

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. नृत्य दिग्दर्शक म्हणून 1995 मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याआधी तो बॅकग्राउंड डान्सर होता. 2000 मध्ये त्याने 'दिल पे मत ले यार' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते. 'तहजीब', 'कांटे', 'धुम', 'रॉक ऑन', 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'ये जवानी है दीवानी', 'एबीसीडी 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'कलंक' चित्रपटासाठीदेखील त्याने नृत्य दिग्दर्शन केले आणि अनेक चित्रपटासांठी पुरस्कार देऊन त्याचा गौरवदेखील झाला आहे.

कोरिओग्राफर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रेमोने दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. 'फालतू' या चित्रपटासह त्याने 2013 मध्ये आलेल्या ‘एबीसीडी’ या डान्सवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याशिवाय 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हे देखील त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. याशिवाय तो 'डान्स इंडिया डान्स', 'झलक दिखला जा' आणि 'डान्स प्लस' या शोचा परीक्षकही होता.

बातम्या आणखी आहेत...