आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:लग्नाला झाली 19 वर्षे पूर्ण, आशुतोष राणांनी पत्नी रेणुकाला शुभेच्छा देताना म्हटले - 'मी कायम तुझाच आहे', इंट्रेस्टिंग आहे दोघांची लव्हस्टोरी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशुतोष यांच्यासोबतचे रेणुका यांचे हे दुसरे लग्न आहे.
  • आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुले असून शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांची नावे आहेत.

अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रेणुका यांनी त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करुन म्हटले,  ''तू आणि मी, किती सुंदर जग आहे, 19 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, खूप खूप प्रेम.''

आशुतोष यांनी दिल्या शुभेच्छा रेणुका यांची ही पोस्ट आशुतोष यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करुन लिहिले, ''तुम ही मेरा प्रेम निवेदन, तुम ही हो जीवन का सार। तुम ही मेरी परम चेतना, तुम ही हो उसका विस्तार॥ सदैव आपका, हृदय से धन्यवाद।''

  • फिल्मी आहे आशुतोष आणि रेणुका यांच्या लव्हस्टोरी

आशुतोष राणा यांच्याशी भेट होण्यापूर्वी रेणुका शहाणेंचे नॉन फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र फार काळ त्यांचे नाते टिकले नाही. रेणुका यांच्या पहिल्या पतीविषयीची माहिती कुठेही उपलब्ध नाहीये. रेणुका यांचे पहिले लग्न हे लव्ह मॅरेज होते. पहिल्या अपयशी लग्नातून खूप काही शिकले असल्याचे, रेणुका यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. 

  • अभिनेत्री राजेश्वरी सचदेवनी करुन दिली होती दोघांची ओळख

हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या ट्रायलवेळी आशुतोष राणा राजेश्वरी सचदेवसोबत आले होते. राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत. येथे ब-याच दिवसांनी राजेश्वरीशी भेट झाल्याने आशुतोष यांच्याकडे रेणुकाचे लक्षच गेले नव्हते. त्यावेळी राजेश्वरीनेच या दोघांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी रेणुका यांनी आशुतोष यांचा 'दुश्मन' सिनेमा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना ती ओळखू शकली नाही. या पहिल्या भेटीला तिने मुळीच सिरिअसली घेतले नव्हते. त्या भेटीनंतर दोघे संपर्कात नव्हते. मात्र 17 ऑक्टोबर 1998 रोजी आशुतोष यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले. एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारणा-या रेणुकाची आशुतोष यांच्याशी वेव्ह लेंथ जुळू लागली. ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 1998 रोजी या दोघांची भेट झाली. 

  • आशुतोष यांनी घातली रेणुकाला लग्नाची मागणी, आशुतोष यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितले, हीच योग्य मुलगी

आशुतोष राणा यांच्या त्यांच्या गुरुंवर खूप विश्वास आहे. त्यांना ते दादाजी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुनच आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला. याच दादाजींनी ही मुलगी तुला तुझ्यासाठी योग्य आहे, असे सांगितले होते. एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून रेणुकाने आशुतोष यांना होकार दिला. 

फाइल फोटो
फाइल फोटो
  • रेणुका यांच्या आईला आले होते टेंशन

आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. आशुतोष यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने रेणुकाचे वडील आनंदी होते. मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. त्याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. शिवाय आशुतोष यांचे कुटुंब बारा जणांचे आहे. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

  • आशुतोष यांच्या बहिणीला करावे लागले रेणुकाचे कन्यादान, मध्य प्रदेशमधल्या छोट्याशा गावात झाले होते लग्न

25 मे 2001 ही दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. लग्न आशुतोष यांच्या गावी होणार असे ठरले. गावी गेल्यानंतरचा अनुभव खूप विचित्र होता, असे रेणुका यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी झाले असे, की रेणुका आपल्या कुटुंबासोबत जेव्हा स्टेशनवर उतरली तेव्हा तिथे हजार-दीड हजाराचा जमाव होता. एखाद्या पक्षाचा राजकीय मेळावा असावा, असंच काहीसं दृश्य तिथे निर्माण झाले होते. ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती त्या हॉटेलचे उद्घाटनही रेणुकाच्या हस्ते झाले. लाईट नसल्याने अंधारातच रेणुकाला मेकअप करावा लागला. लग्नात इतकी गर्दी होती, की रेणुकाचे नातेवाईक इतकेच नाही तर आईवडीलसुद्धा मंडपापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. त्यामुळे रेणुकाच्या नणंदेने तिचे कन्यादान केले. 

  • आशुतोष यांच्या कुटुंबात अ‍ॅडजस्ट करायला लागला वेळ

लग्नानंतर रेणुकाला आशुतोष यांच्या कुटुंबाशी अ‍ॅडजस्ट करायला बराच वेळ लागला. राणांच्या घरी मोठ्यांसमोर येताना स्त्रीने डोक्यावरून पदर घ्यायची पद्धत आहे. स्वयंपाक करतानासुद्धा तसंच राहावं लागतं. त्यामुळे गावी गेले की त्यांना त्या वातावरणात जुळवून घेणे कठीण व्हायचे. अगदी मुंबईतील त्यांच्या घरी गावातील पाहुणे आले की डोक्यावर पदर हा घ्यावाच लागायचा. आजही सासरे, मोठे दीर घरी असले की रेणुका डोक्यावर पदर घेतात. 

बातम्या आणखी आहेत...