आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Renuka Shahane, Riteish Deshmukh, Dia Mirza Urmila SLAMS Kangana Ranaut For Comparing Mumbai With PoK : Renuka Says, 'Maybe It Was Naive Of Me To Expect Any Better From You'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाविरोधात संतापाची लाट:पीओकेसोबत मुंबईची तुलना केल्याने बॉलिवूडकर भडकले, उर्मिला म्हणाले -  'फक्त कृतघ्न लोक असे वागू शकतात'; सोनू सूद म्हणाला - 'मुंबई .. हे शहर नशीब बदलते'

मुंबई5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • बॉलिवूड कलाकारांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

खळबळजनक वक्तव्ये करुन चर्चा एकवटणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने गुरुवारी एक ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. ''आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले आहे. तिच्या या वक्तव्यावर बॉलिवूड कलाकारांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ''प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझे बॉलिवूड स्टार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटले नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,'' असे ट्विट त्यांनी केले आहे.

रेणुका शहाणे यांना उत्तर देताना कंगनाने विचारले - तुम्हीही माझे लचके तोडण्याची वाट पाहात होता का? रेणुका शहाणे यांच्या ट्विटनंतर कंगनाने त्यांना उत्तर देताना लिहिले, ''प्रिय रेणुकाजी, सरकारी धोरणांवर टीका करणे हे एखाद्या जागेचे कौतुक न करण्यासारखे कधीपासून झाले. तुम्ही इतक्या भोळ्या तर नक्कीच नाही. की तुम्हीही इतर गिधडांप्रमाणे माझे लचके तोडण्याची वाट पाहत होता?, तुमच्याकडून अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे,” असे कंगना म्हणाली आहे,

 • उर्मिलाने म्हटले कंगनाला कृतघ्न

कंगनाच्या वक्तव्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील एक ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ''महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे… मुंबईने लाखो भारतीयांना नाव, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करु शकतात. हे खूप धक्कादायक आणि कधीही न पटणारे आहे'', असे ती म्हणाली आहे.

 • दीया मिर्झा

दीया मिर्झाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "मुंबई मेरी जान. मी जवळजवळ 20 वर्षे येथे राहतेय आणि काम करतेय. वयाच्या 19 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी येथे आले होते. या शहराने मोकळ्या मनाने माझे स्वागत केले आणि मला सुरक्षित ठेवले. वैश्विक, सर्वसमावेशक, विविधता असलेले सुंदर शहर", असे दीया म्हणाली आहे.

रितेश देशमुख

अभिनेता सोनू सूद

मीरा चोप्रा

 • कंगनाने केली होती पाकसोबत मुंबई शहराची तुलना

मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. हा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमानच आहे, असे म्हटलेे होते. राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser