आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुका शहाणे यांचा वाढदिवस:पहिले लग्न तुटल्यानंतर आशुतोष राणांसोबत थाटला दुसरा संसार, अडीच वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी केले होते लग्न

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेणुका यांच्या आईंना आले होते टेंशन

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. आपल्या मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी ही अभिनेत्री आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 ऑक्टोबर 1966 रोजी रेणुका यांचा जन्म झाला. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुका यांनी 1992 मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 1993 ते 2001 या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुका यांच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले.

रेणुका यांनी बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले आहे. त्यांचे हे दुसरे तर आशुतोष यांचे पहिले लग्न आहे. दोघांची लव्ह स्टोरी अतिशय फिल्मी आहे.

राजेश्वरी सचदेवनी करुन दिली होती ओळख
हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या ट्रायलवेळी आशुतोष राणा राजेश्‍वरी सचदेवसोबत आले होते. राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत. येथे ब-याच दिवसांनी राजेश्वरीशी भेट झाल्याने
आशुतोष यांच्याकडे रेणुका यांचे लक्षच गेले नव्हते. त्यावेळी राजेश्‍वरीनेच या दोघांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी रेणुका यांनी आशुतोष यांचा 'दुश्‍मन' सिनेमा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना रेणुका ओळखू शकल्या नाही. मात्र आशुतोष यांनी हम आपके है कौन या चित्रपटातील रेणुका यांचे काम पाहिले होते आणि ते त्यांच्या कामाने प्रभावित होते. यावेळी जवळजवळ अर्धा तास दोघांत बोलणे झाले होते. त्या भेटीनंतर मात्र दोघे संपर्कात नव्हते.

अशी पुढे सरकली लव्ह स्टोरी

17 ऑक्टोबर 1998 रोजी आशुतोष यांनी रेणुका यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले. एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारणा-या रेणुका यांची आशुतोष यांच्याशी वेव्ह लेंथ जुळू लागली. ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 1998 रोजी या दोघांची भेट झाली होती. आशुतोष राणा यांच्या त्यांच्या गुरुंवर खूप विश्वास आहे. त्यांना ते दादाजी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुनच आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला. याच दादाजींनी "ही मुलगी तुला तुझ्यासाठी योग्य आहे'', असे सांगितले होते. एक दिवस आशुतोष यांनी रेणुका यांना लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून रेणुका यांनी आशुतोष यांना होकार दिला.

रेणुका यांच्या आईंना आले होते टेंशन
आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. आशुतोष यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने रेणुका यांचे वडील आनंदी होते. मात्र त्यांच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण
आले होते. त्याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. शिवाय आशुतोष यांचे कुटुंब बारा जणांचे आहे. मात्र रेणुका यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 25 मे 2001 रोजी आशुतोष यांच्या मुळगावी झाले होते. ते आता दोन मुलांचे आईवडील आहेत. शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...