आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICU मध्ये अक्षयची आई:अक्षय कुमारची आई अरुणा यांची प्रकृती गंभीर नाही; 3 दिवसांपूर्वी केले होते दाखल, अक्षय 'सिंड्रेला'चे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला परतला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार शूटिंग अर्धवट सोडून लंडनहून मुंबईत परतला आहे. त्याची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती ठिक नसून त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु आहेत. अरुणा या 77 वर्षांच्या आहेत. आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समजल्यानंतर अक्षय तातडीने लंडनहून मुंबईत दाखल झाला. काही रिपोर्ट्समध्ये अरुणा यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले गेले होते. मात्र अक्षय कुमारच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा यांची प्रकृती गंभीर नसून स्थिर आहे. त्यांना वयाशी संबंधित समस्या आहेत. त्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून मुंबईला परतला. अक्षय लंडनमध्ये त्याच्या आगामी 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. तसे पाहता अक्षय 10 सप्टेंबरला मुंबईत परतणार होता. इथे आल्यानंतर तो 'रक्षाबंधन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होता. त्यानंतर त्याने एक छोटे फॅमिली व्हेकेशन प्लान केले होते.

कामावर परिणाम होणार नाही
अक्षय आईसोबत राहता यावे म्हणून मुंबईला परतला असला तरी त्याने आपल्या कामावर याचा परिणाम होऊ दिलेला नाही. अक्षयला तातडीने मुंबईत परतावे लागल्याने त्याने 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या निर्मात्यांना ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती दृश्ये चित्रीत करावी असे सांगितले आहे.

अक्षयचे 9 प्रोजेक्ट्स आहेत पाइपलाइनमध्ये
77 वर्षीय अरुणा भाटिया यांचे काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. अरुणा या देखील चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी 'हॉलिडे'सह काही गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती. तर दुसरीकडे अक्षय कुमारचे पुढील वर्षीपर्यंत सुमारे अर्धा डझन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. 'बेल बॉटम', 'सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे', 'रक्षाबंधन', 'राम सेतु', 'OMG-ओह माय गॉड 2' आणि वेब सीरीज 'द एंड' हे त्याचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

बातम्या आणखी आहेत...