आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोरखा'च्या फर्स्ट लूकमध्ये झाली चूक:'गोरखा' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चुकीचे शस्त्र दाखवल्याने भडकले सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, अक्षय कुमार म्हणाला चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेवानिवृत्त अधिकारी माणिक यांनी ट्विटरद्वारे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चुकीच्या खुकरी (एक प्रकारचे धारदार शस्त्र) चा वापर केल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय लवकरच आनंद एल राय यांच्या 'गोरखा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय लिजेंड्री ऑफिसर मेजर इयान कार्डोजो यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या घोषणेबरोबरच निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर समोर येताच एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने त्यात झालेली चूक समोर आणली आहे. लष्करी अधिकाऱ्याने चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अक्षय कुमारने त्यांचे आभार मानले आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी माणिक यांनी ट्विटरद्वारे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चुकीच्या खुकरी (एक प्रकारचे धारदार शस्त्र) चा वापर केल्याचे सांगितले आहे. याबद्दल माहिती देताना त्यांनी लिहिले, 'प्रिय अक्षय कुमार, माजी गोरखा अधिकारी असल्याने हा चित्रपट बनवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मात्र, तपशील महत्वाचा असतो. कृपया योग्य खुकरीचा वापर करा ज्याला दुसऱ्या बाजूला धार असते. ती तलवारी नाहीये. खुकरी आतल्या बाजूला वाकलेली असते. उदाहरणार्थ, मी एक छायाचित्र दाखवत आहे.'

यावर अक्षय कुमारने लिहिले, 'प्रिय मेजर जॉली. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रीकरणादरम्यान आम्ही अत्यंत काळजी घेऊ. गोरखा चित्रपट बनवताना मला खूप अभिमान वाटतोय. आम्ही तुमच्या सल्ल्या लक्षात ठेऊ, ज्यामुळे चित्रपट वास्तव दिसण्यास मदत होईल.'

अक्षय कुमारच्या 'गोरखा' या चित्रपटापूर्वी सेवानिवृत्त अधिकारी माणिक यांनी 'सॅम बहादूर' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झालेली चूकदेखील सांगितली होती. पोस्टरमध्ये विकी कौशल चुकीच्या बॅचसह दिसला होता. यावर माणिक यांनी लिहिले, 'हे एक गोरखा अधिकारी आहेत, जे सोनेरी नव्हे तर काळी बॅच घालतात. चित्रपट निर्मात्यांकडून आपण एवढी किमान अपेक्षा करू शकतो. या लिजेंड्री सोल्जरच्या यूनिफॉर्ममध्ये झालेली चुक सुधारा.'

अक्षय कुमारचा 'गोरखा' या चित्रपटाचे पोस्टर दस-याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले, "कधीकधी आपल्यासमोर अशा कथा येतात ज्या इतक्या प्रेरणादायी असतात की तुम्हाला त्या तयार करायच्या असतात. गोरखा - महान योद्धे जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. आयकॉनची भूमिका साकारताना आणि हा विशेष चित्रपट सादर करताना सन्मान वाटतो.'

इयान कार्डोजो कोण आहेत?
इयान कार्डोजो हे पाचव्या गुरखा रायफल्सचे मेजर जनरल होते. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात इयान कार्डोजो यांनी आपले अदम्य धैर्य आणि शौर्य दाखवले. युद्धादरम्यान अशी परिस्थिती होती जेव्हा त्यांना स्वतःचा पाय कापावा लागला. युद्धादरम्यान एका ऑपरेशनमध्ये, इयान कार्डोजो यांचा पाय लँडमाइनवर पडला आणि लँडमाइनवर आदळताच स्फोट झाला. जेव्हा इयान कार्डोजोंना कळले की स्फोटानंतर त्याचा पाय खूपच जखमी झाला आहे, तेव्हा त्यांनी स्वतःचा पाय कापला होता.

बातम्या आणखी आहेत...