आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राधे'चा निर्णय:सलमान खान चित्रपटाच्या कमाईचा एक भाग गरजूंच्या मदतीसाठी करणार खर्च, खरेदी करणार ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स दान केले जातील.

कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडचे अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. यात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानदेखील मागे नाही. तो गरजुंसाठी आवश्यक ती सर्व मदत करतोय. आता सलमान खानने झी एंटरटेन्मेंटसोबत मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाच्या कमाईतील एक भाग ते कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देतील. यासाठी त्यांनी गिव्ह इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत, आवश्यक वैद्यकीय उपकरणे म्हणजेच ऑक्सिजन सिलिंडर्स, कन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स दान केले जातील.

सलमानची मुख्य भूमिका असलेला राधे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी ईदच्या दिवशी थिएटरसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

शक्य तितकी मदत करण्यास तयार आहोत आम्ही
झी स्टुडिओच्या प्रवक्त्याने सांगितले की- “देशातील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे आणि एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही कोविड -19 विरूद्धचा लढा आणखीन मजबूत करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्यास तयार आहोत. आम्ही केवळ आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजनच करत नाहीत तर देशभर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत. राधे या चित्रपटाच्या प्रदर्शनातून येणारे उत्पन्नातील एक मोठा भाग महामारीने पीडित लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.”

आतापर्यंत केले आहे हे काम
झी स्टुडिओने आरोग्य सेवा मूलभूत सुविधा वाढविण्याच्या दिशेने, 240+ रुग्णवाहिका, 46,000+ पीपीई किट्स, ऑक्सिजन ह्युमिडीफायर्स देण्यात आले होते. त्याचबरोबर, कंपनीने महाराष्ट्रातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 304 बेडचे कोविड हेल्थकेअर सेंटर (डीसीएचसी) तयार करुन ते दान केले.

बातम्या आणखी आहेत...