आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिया चक्रवर्तीची कबुली:रियाने कबूल केली की 9 जून रोजी सुशांतने तिला 'कैसी हो बेबू' हा मेसेज पाठवला होता, पण रागाच्या भरात तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत सांगितले की, सुशांतच्या वागण्यामुळे ती खूप दुखावली गेली होती, कारण त्याने 8 जूननंतर तिला एकदाही फोन केला नव्हता.
  • रियाने सुशांतची बहीण मितूवर निशाणा साधला. ती म्हणआली की - 8 ते 12 जून दरम्यान ती त्याच्याबरोबर होती, ती पुढे येऊन या पाच दिवसांत काय घडले ते का सांगत नाहीये.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून जिच्याकडे बघितले जातेय त्या रिया चक्रवर्तीने पहिल्यांदा एका वृत्त वाहिनीला मुलाखत देऊन आपले मौन सोडले आहे. या मुलाखतीत दरम्यान सुशांतचा नंबर ब्लॉक केल्याचे रियाने कबूल केले आहे. रियाच्या म्हणण्यानुसार तिने रागाच्या भरात हे पाऊल उचलले होते. खरं तर, रियाने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले आणि तिच्या म्हणण्यानुसार, सुशांतने तिला एकदाही थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि पुन्हा फोनदेखील केला नव्हता.

  • 9 जून रोजी सुशांतने मेसेज पाठवला होता

आज तकला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली- त्याने मला 9 जून रोजी मेसेज केला होता. त्यात लिहिले होते की, 'कैसी हो मेरी बेबू' (सुशांत रियाला प्रेमाने बेबू म्हणायचा). पण त्याला मी त्याच्या आयुष्यात नकोय, हा विचार करुन मी खूप दुखावले गेले होते. त्यावेळी मी आजारी आहे, हे सुशांतला माहित होते. 8 जून रोजी मी त्याचे घर सोडल्यानंतर त्याने माझ्याशी संपर्क केला नाही. 9 जून रोजी मी रागाच्या भरात त्याचा नंबर ब्लॉक केला होता. माझ्या आईवडिलांना याविषयी काहीही माहित नव्हते. पण सुशांत माझ्या भावाच्या संपर्कात होता.'

ती पुढे म्हणाली, 'जर त्याने मला एकदा जरी फोन केला असता, किंवा असे काही तरी घडू शकते, याची मला जराशी देखील कल्पना असती तर मी त्याच्याकडे परतले असते. पण काय घडले हे मला माहित नाही? मलाही सर्व काही जाणून घ्यायचे आहे. त्याची बहीण मितू 8 ते 12 जून दरम्यान तेथे होती. ती समोर येऊन या दिवसांत काय घडले ते सांगत का नाहीये?', असा प्रश्न रियाने विचारला आहे.

  • बातमी कळली तेव्हा विचार केला की, अशी अफवा कशी असू शकते

या मुलाखतीदरम्यान रियाने सुशांतच्या मृत्यूची बातमी तिला कशी समजली याविषयी सांगितले. ती म्हणाली, '14 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मी माझ्या भावाबरोबर माझ्या खोलीत होते. तेव्हा मला माझ्या एक मित्राचा फोन आला. आणि सुशांतच्या मृत्यूची अफवा पसरली असून ती थांबव, असे तो म्हणाला. तुम्ही कुठे आहात, सुशांतला समोर येऊन बोलायला सांग, असे तो म्हणाला. तेव्हा त्याला माहित नव्हते की मी सुशांतचे घर सोडले असून माझ्या घरात आहे. अशी अफवा कशी येईल असा प्रश्न मला पडला. मग 10-15 मिनिटांतच कुठूनतरी स्पष्टीकरण आले.' सुशांतने आत्महत्या केल्याचे समजताच मी कोलमडून गेले होते, असे रियाने यावेळी सांगितले.

  • बातमी मिळाल्यानंतरही सुशांतच्या घरी गेली नव्हती रिया

रियाने सांगितल्यानुसार, सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही ती सुशांतच्या घरी गेली नव्हती. ती म्हणाली, "मी त्याच्या घरी गेले नव्हते, मी पुरती कोलमडले होते. मला खूप मोठा धक्का बसला होता. हे कसे घडेल हे मला समजू शकले नाही. मला सांगण्यात आले की त्याच्या अंत्यसंस्कारासाठी येणा-या लोकांच्या यादीत माझे नाव नाही. इंडस्ट्रीतील बर्‍याच जणांची नावे त्यात होती. मला इंडस्ट्रीतील काही लोकांकडूनच समजले की, यादीत माझे नाव नाही आणि मी तिथे अजिबात जाऊ शकत नाही. सुशांतच्या कुटुंबीयांना मी तिथे नकोय.'

  • मित्राने दिला होता सुशांतचे पार्थिव बघण्याचा सल्ला

रियाने सांगितल्यानुसार, 'मी सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्यास तयार होते, माझे इंडस्ट्रीतील एक-दोन मित्र तेथे जाणार होते. त्यापैकी एकाने मला फोन करुन आणि एकाने माझ्या घरी येऊन मला समजावून सांगितले की, मी तिथे जाऊ शकत नाही. कारण त्या लोकांना (सुशांतच्या कुटुंबाला) तू तिथे नकोय. या यादीमध्ये तुझे नावदेखील नाही. तू तिथे गेली तर तुला तेथून अपमानिक करुन बाहेर काढले जाईल. तुझी मानसिक स्थितीदेखील आता चांगली नाही. त्यामुळे तू तिथे येऊ नको. मी सकाळपासूनच सुशांतला कधी बघू शकेल याची वाट बघत होते. त्यामुळे माझ्या दोन मित्रांनी मला म्हटले की, तुझी मानसिक अवस्था ठिक नाहीये. त्यामुळे एकदा सुशांतची बॉडी बघणे तुझ्यासारखी आवश्यक आहे. अन्यथा या गोष्टीवर तुझा कधीही विश्वास बसणार नाही आणि ही गोष्ट स्वीकारणे तुझ्यासाठी फार कठीण होईल.'

  • याच कारणास्तव सुशांतला म्हटले होते 'सॉरी बाबू'

शवागारात गेल्यानंतर रियाने सुशांतला सॉरी बाबू म्हटले होते. याचे कारण तिला विचारले असता ती म्हणाली, "होय, मी सॉरी बाबू म्हणाले होते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती अजून काय म्हणू शकेल? मी माफी मागितली कारण त्याने आपले जीवन संपवले होते. आणि आजही मला वाईट वाटतंय की, त्याच्या मृत्यू एक विनोद झाला आहे. मला खेद वाटतोय की, तुझ्या शेवटच्या चांगल्या आठवणी, तुझी चांगली कामे, तुझी बुद्धिमत्ता आणि चॅरिटी कुणालाही आठवत नाहीये. मला खेद वाटतोय की तुझ्या मृत्यूची चेष्टा केली जातेय. माझी त्याच्याकडे माफी मागणे हेसुद्धा चुकीच्या अर्थाने घेतले जात असेल तर यावर काय बोलू शकते?', असे रियाने स्पष्ट केले.

  • शवागारात केवळ 3-4 सेकंद थांबले होते

शवागाराच्या आत थांबल्याविषयी रिया म्हणाली, 'कदाचित तीन ते चार सेकंद मी तिथे थांबले असेल. मला बाहेर वाट बघायला सांगण्यात आले होते. माझ्या एका मित्राने कुणाकडे तरी विनंती केली की, शेवटचे सुशांतचे पार्थिव ती बघू इच्छित.े त्यावर सांगण्यात आले की, एकदा पोस्टमॉर्टम संपल्यावर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जाईल, तेव्हा तुम्ही ते बघू शकता. त्यामुळे जेव्हा पार्थिव व्हॅनमध्ये नेले जात होते, तेव्हा मी सुशांतला तीन ते चार सेकंद पाहिले आणि तेव्हा सॉरी म्हटले होते. मग मी त्याच्या पायाला स्पर्श केला. आणि मला वाटते की एक भारतीय म्हणून कुणी एखाद्याच्या पायाला का स्पर्श करतो हे समजू शकते.'