आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरणात अमली पदार्थांचा अँगल:रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन खुलासा, सुशांतने गांजा सोडण्याचे दिले होते वचन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीच्या मोबाइल फोनमधून हे सर्व चॅट्स अंमलबजावणी संचालनालयाने रिट्रीव केले आहेत.
  • ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभाग देखील या प्रकरणाच्या चौकशीत सामील झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मंगळवारी रिया चक्रवर्तीच्या मोबाइलमधील जुने चॅट्स समोर आल्यानंतर अमली पदार्थांचा अँगलचा खुलासा झाला होता. आता एक दिवसानंतर रियाचे आणखी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहे. ज्यामध्ये ती सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीशी बोलत आहे. या चॅटमधून सुशांतला गांजा (मारिजुआना) सोडायचा होता आणि श्रुती त्याला यात मदत करत असल्याचे समोर आले आहे.

इंडिया टुडेने आपल्या वृत्तात रिया आणि श्रुती यांच्यात जानेवारी 2020 मध्ये झालेल्या बातचीतचा व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये एका घटनेचादेखील उल्लेख आहे, ज्यात एका भेटीदरम्यान सुशांत रडू लागला आणि आपल्या मित्राला घरातून त्याने निघून जाण्यास सांगितले होते.

दोघींमधील संवाद पुढीलप्रमाणे...

श्रुती- 'तो सकाळी रडत होता. तो सिद्धूला घरी परत जाण्यास सांगतोय. त्याला आज मदत आणि उपचार हवे आहेत. चला केरसी (मानसोपचार तज्ज्ञ केरसी चावडा) ला भेटायला जाऊया. आम्ही सर्व त्याची काळजी घेत आहोत आणि वेळेत औषधे देत आहोत, पण त्याचा फायदा होत नाहीये. त्याला गांजा घेणे पूर्णपणे बंद करावे लागेल आणि तो कालपासून त्याने ते सोडलेदेखील आहे.'

रिया - होय

श्रुती- 'तो झोपायला गेला आहे. मीही एक दिवस जात आहे. साहिलला सकाळी 11 वाजता आरोग्य निधीला जायचे आहे.'

या संभाषणादरम्यान ज्या साहिलचा उल्लेख झाला आहे, तो सुशांतचा बॉडीगार्ड होता आणि त्याला ज्या आरोग्य निधीत जायचे होते, ते मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक रुग्णालय आहे.

  • ड्रग्ज डीलरकडे मागितले होते ड्रग्ज

मंगळवारी यापूर्वी रियाचे जे चार चॅट समोर आले होते, ते मार्च 2017 चे होते. त्यामध्ये रिया चक्रवर्तीने गौरव नावाच्या व्यक्तीसोबत ड्रग्जविषयी चर्चा केली होती. 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठविलेल्या या चॅटमध्ये रियाने लिहिले की, 'जर आपण हार्ड ड्रग्जविषयी बोलत असून तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही' दुस-या चॅटमध्ये रिया गौरवला विचारते, 'तुझ्याजवळ एमडी आहे का?' येथे एमडीचा अर्थ 'मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन' असा आहे, हा एक ड्रग्जचा प्रकार आहे. 8 मार्च 2017 रोजीच्या आणखी एका चॅटमध्ये रिया गौरवला म्हणाली, "जास्त नशा असलेल्या ड्रग्जविषयी बोलायचे झाल्यात तर मी ते जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेतले होते.' रियाने ड्रग्ज घेतल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर ती गौरवला विचारते, "तुझ्याजवळ एमडी आहे का?"

17 एप्रिल 2020 च्या या चॅटमध्ये सॅम्युअल मिरांडा म्हणतो, "हाय रिया, स्टाफ जवळजवळ संपला आहे." "मग मिरांडा रियाला विचारतो, "आपण हे शोविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का?, पण त्याच्याकडे फक्त 'हॅश' आणि 'बड' आहे.' हे दोन्ही सामान्य ड्रग्ज मानले जातात. एका चॅटमध्ये जया साहने रियाला सांगितले होते - पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये 4 थेंब घालून त्याला द्यायचे आहे. मग 40 मिनिटे लागतील.

  • सुशांतची बहीण म्हणाली - सीबीआयने त्वरित कारवाई करावी

मंगळवारी रियाच्या ड्रग्ज कनेक्शनवर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने ड्रग्ज बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. 'हा एक गुन्हा आहे. सीबीआयने त्वरीत कारवाई केली पाहिजे #RheaDrugsChat', असे ट्विट श्वेताने केले आहे. सोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

  • वकिलांचा दावा - रियाने कधीच ड्रग्ज घेतले नाही

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या ड्रग्ज कनेक्शनचे खंडन केले आहे. रियाने आजपर्यंत एकदाही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असा दावा सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. सोबतच ती ब्लड टेस्ट करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

View this post on Instagram

Rhea Chakraborty's deleted messages and their details have been accessed from the data dump obtained by the ED. The chats are about usage and dealing with a particular drug, and the actress had deleted those chats, but the ED retrieved it using their forensic team's expertise. The drug she talked about is a party drug mostly used in high-profile parties, not available to everyone. All deleted chats between Rhea and others about Drugs they gave to SSR and people involved in this are 1. Gaurav (some dealer) 2. Jaya Saha ( related to KWAN) 3. Shruti Modi 4. Samuel Miranda 5. Rhea Chakraborty 7. Showik Chakraborty 8. Showik's friend Chat 1: ‘Incase we speak about hard drugs, I haven’t been doing too much. Tried MDMA once’, chat between Rhea & Gaurav who is allegedly a drug dealer. Chat 2: ‘You have MD?’, chat between Rhea & Gaurav who is allegedly a drug dealer. Chat 3: ‘I have asked him to coordinate with Shruti & reach it up’, chat between Rhea & Jaya Saha. Chat 4: ‘Thank you so much’, Rhea to Jaya Saha & Jaya replies saying ‘No problem bro, hope it helps’. Chat 5: Hi Rhea, the stuff is almost over, Miranda to Rhea. Chat 6: ‘Use 4 drops in tea, let him sip it …. Give it 30-40 mins to kick in’, Jaya Saha to Rhea. Chat 7 : ‘Should we take it from Showik’s friend? But he has just hash & bud’, Miranda to Rhea. Reports are doing the rounds that ED officials will be probing if drugs were used to deteriorate Sushant’s mental health. ED has shared Rhea’s WhatsApp messages with the CBI team and the Narcotics Control Bureau. . . Follow @staunchmedia (Source: Times Now) . #SSRCulpritsBehindBar #sushantdeathmystery #Sushantsinghrajput #CBI #cbitakesover #CBIForSSR #ripsushantsinghrajput #sushant #sushantrhea #RheaChakraborty #Warriors4SSR #bollywood #victoryforssr #justiceforsushantsinghrajput #justiceforssr #dilbechara #satyamevjayate #1ststeptossrjustice #cbicrucialforssr #cbienquiryforssr #bollywoodactor #cbienquiryforsushant #cbiforsushant #staunchmedia

A post shared by Staunch Media🧿 (@staunchmedia) on Aug 25, 2020 at 9:48am PDT

  • जप्त केलेल्या मोबाइल फोनच्या तपासणीतून उघड

10 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने रिया आणि तिच्या कुटुंबीयांचे 4 मोबाइल हँडसेट जप्त केले होते. यातील दोन फोन रियाचे असून उर्वरित दोन तिच्या वडील आणि भावाचे आहेत. दोन आयपॅड आणि एक लॅपटॉपही ईडीने ताब्यात घेतला. या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. या तपासणी दरम्यान ड्रग्ज अँगल उघड झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणात रिया आणि तिच्या भावाव्यतिरिक्त ईडी आतापर्यंत सुशांतचे वडील केके सिंह, बहीण प्रियंका, मितू, रिया चक्रवर्तीच्या कुटुंबातील सदस्य, चित्रपट निर्माते रुमी जाफरी, सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांची चौकशी केली आहे.

0