आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थ डे पार्टीत पोहोचली रिया:'रोडीज' फेम राजीव लक्ष्मणला मिठी मारताना दिसली रिया चक्रवर्ती, फोटोवरुन ट्रोल होताच राजीवने डिलीट केली पोस्ट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

'रोडीज' फेम राजीव लक्ष्मणचा मुलगा रिदमच्या वाढदिवसाच्या पार्टीत रिया चक्रवर्ती सहभागी झाली होती. या पार्टीचे काही फोटो राजीवने सोशल मीडियावर शेअर केले. पण हे फोटो पाहिल्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी रियासह राजीवला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता राजीवने हे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. त्या जागी त्याने एक नवीन मेसेज पोस्ट केला आहे.

राजीवने ट्रोलिंगपासून बचाव करण्यासाठी दिले स्पष्टीकरण
राजीवने रियासोबतचा फोटो शेअर करत त्याला 'माय गर्ल' असे कॅप्शन त्याने दिले होते. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजीवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने लिहिले, 'माझ्या पोस्टमुळे अडचणीत वाढ झाली. रिया ही माझी खूप चांगली आणि जुनी मैत्रीण आहे आणि तिला पुन्हा भेटून मला आनंद झाला. मी तिच्या भल्यासाठी प्रार्थना करतो', असे राजीवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाठलाग करू नका

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी रियाचे आई-वडील नव्या घराच्या शोधात असल्याचे दिसून आले होते. यावेळी तिे पापाराजींना त्यांचा पाठलाग करु नका, असे म्हटले होते.

राजीवसोबतचा रियाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर एका नेटक-याने राजीवसोबतचा रियाचा फोटो महेश भट्टसोबतच्या एका फोटोसह मर्ज केला आहे. रियाच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने सोनाली केबल, जलेबी, मेरे डॅड की मारुती या चित्रपटांमध्ये काम केले. अलीकडेच रुमी जाफरींनी 2021 मध्ये रिया चक्रवर्तीला चित्रपटात परत आणणार असल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...