आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज चॅटमध्ये अडकले सेलिब्रिटी:दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत यांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार, नार्कोटिक्स ब्युरोने 3 दिवसांत हजर राहायला सांगितले

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अभिनेत्रींना पुढील तीन दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावले आहे. या अभिनेत्रींना पुढील तीन दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

तत्पूर्वी, एनसीबीने मंगळवारी क्वान या टॅलेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे बुधवारी उच्च न्यायालयाला सुट्टी

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या रिया चक्रवर्तीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीसाठी आजचा दिवस निश्चित होता, परंतु आज सुनावणी होऊ शकली नाही. कारण, मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सुट्टी जाहीर केली होती.

आता गुरुवारी होणार रियाच्या जामीन याचिकेवर सुनावणी

आता सुनावणी उद्या होणार असल्याचे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आज चित्रपट निर्माते मधु मांटेनाची चौकशी करत आहे. 16 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या रियाचा जामीन अर्ज विशेष कोर्टाने (एनडीपीएस) 2 वेळा फेटाळला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करणा-या एनसीबीने 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केली होती. दुसर्‍या दिवशी तिला भायखळा तुरुंगात हलविण्यात आले.

6 ऑक्टोबरपर्यंत रियाची न्यायालयीन कोठडी

रियावर ड्रग पेडलर्सच्या संपर्कात असल्याचा, सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. मंगळवारी रियाला भायखळा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. विशेष कोर्टाने तिची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. अशा परिस्थितीत रियाला आता हायकोर्टाकडून अपेक्षा आहे. रियासह तिचा भाऊ शोविकनेही हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे.

ड्रग्ज प्रकरणात 20 जणांना अटक

एनसीबीने रिया आणि शोविकसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, मदतनीस दिपेश सावंत आणि अनेक ड्रग्ज पेडलर्ससह 20 जणांना अटक केली आहे. विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मिरांडा, सावंत आणि ड्रग पेडलर अब्दुल बासित परिहार यांनी उच्च न्यायालयात अपील केली आहे. त्यांच्या अर्जावर हायकोर्टात पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी आहे.

बातम्या आणखी आहेत...