आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज प्रकरण:तीन महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला जामीन मिळाला, ड्रग पेडलरच्या जबाबावरून झाली होती अटक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने शोविक चक्रवर्तीला 4 सप्टेंबरला आणि रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबरला अटक केली होती.

ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेल्या शोविक चक्रवर्तीला अखेर 3 महिन्यांनंतर स्थानिक एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. यापूर्वी, त्याचा जामीन अर्ज दोनदा उच्च न्यायालयाने आणि दोनदा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.

ड्रग पेडलर अब्देल बासित परिहार याच्या जबाबानंतर 4 सप्टेंबर रोजी 24 वर्षीय शोविकला अटक झाली होती. अब्देल बासितच्या जबाबानुसार, शोविक जैद विलित्रा आणि कैझान इब्राहिमकडून ड्रग्ज घेत होता. याप्रकरणी एनसीबीने अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएलाचा भाऊ अगिसिलाओस यालादेखील अटक केली होती. तेव्हापासून विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवण्यासोबतच शोविक अनेक ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते.

या आधारावर मागितला होता जामीन
शोविककडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते, एनसीबीकडे एकमेव पुरावा सह-आरोपींचे विधान आहे, असे 4 नोव्हेंबर रोजी वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले होते. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात रिया आणि सुशांतचा कूक दिपेश सावंत आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला यांनाही अटक केली होती. सध्या तिघांनाही जामीन मंजूर झाला
आहे.

शोविकचे मित्रासोबतचे ड्रग्ज चॅट आले होते समोर
रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचे ड्रग्जच्या खरेदी-विक्रीसोबतच आपल्या वडिलांसाठी अंमली पदार्थ खरेदी करणारे काही चॅट्स समोर आले होते. 10 ऑक्टोबर 2019 रोजी शोविकच्या मित्राने त्याच्याशी
ड्रग्जविषयी संभाषण केले होते. चॅटमध्ये शोविकचा मित्र ड्रग्ज खरेदीसाठी त्याची मदत मागतो. शोविक त्याला पाच ड्रग्ज विक्रेत्यांचे फोन नंबर देतो.

चॅटमध्ये शोविकचा मित्र त्याला 'वीड', 'हॅश', 'बुड' यासारख्या ड्रग्जबद्दल विचारत आहे. शोविक आपल्या मित्राला 'बड' नावाच्या ड्रग्जसाठी जैद आणि बासितचा नंबर देतो. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या
पथकाने या चॅट्सच्या आधारे दोन दिवसांतच जैद बासित यांना अटक केली होती.

दीपेश-सॅम्युअल-अगिसिलाओस यांचे कनेक्शन होते

एनसीबीने काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देखील शोधून काढले होते, ज्यावरुन अगिसिलाओस डीमेट्रियड्स सुशांतच्या घरातील सदस्य दीपेश सावंत आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. दोघांनाही रिया आणि शोविकसह अटक केली गेली. पण या दोघांचीही रियासमवेत 7 ऑक्टोबरला जामिनावर सुटका करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser