आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आली रिया चक्रवर्ती:रिया म्हणाली - 'माझ्याकडून एकच गुन्हा झाला की, मी सुशांतवर प्रेम केले'; महेश भट्टसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरही दिली प्रतिक्रिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवसाआधी रियाने त्याचे घर सोडले होते. त्यावेळी तिने महेश भट्ट यांना व्हॉट्सअ‍ॅप चॅट करुन मी पुढे जातेय... असे सांगितले होते.
  • एका वृत्त वाहिनीशी झालेल्या बातचीतनुसार, सुशांतने आपल्याला पुन्हा कॉल केला नाही, यामुळे रिया दुखावली गेली होती.
  • हार्ड डिस्कचा डेटा डिलीट केल्याचे रियाने नाकारले आहे. सोबतच सुशांतच्या कुटुंबीयांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ती म्हणाली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मीडियात व्हायरल झाले होते. हे चॅट अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असल्याचे म्हटले गेले होते. मात्र रियाच्या मते, या चॅट्सचा सुशांतशी काहीही संबंध नाही. रियाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

  • सुशांतने परत कॉल केला नाही म्हणून मी दुखावले गेले होते : रिया

रिया म्हणाली, "सुशांतने मला परत कॉल केला नाही, म्हणून मी खूप दुखावले गेले होते. तो मला त्याच्या आयुष्यात परत घेऊ इच्छित नव्हता. मी आजारी असल्या कारणाने तो मला सोडत आहे का असा विचार मी करीत होते. पण भट्ट सरांशी झालेल्या संभाषणाचा याच्याशी काहीही संबंध नव्हता", असे रियाने सांगितले आहे.

8 जून रोजी रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यात रात्री 7:43 ते 8:08 दरम्यान झालेल्या व्हाट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. याच दिवशी रियाने सुशांतचे घर सोडले होते. चॅटमध्ये रियाने आता मी पुढे जातेय, असे लिहिले होते. त्यावर उत्तर म्हणून भट्ट यांनी तिला मागे वळून न पाहण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नाही तर 9 ते 14 जून दरम्यान या दोघांमध्ये झालेले चॅट्सदेखील व्हायरल झाले आहेत आणि यात रियाने तिला पुन्हा एकदा वाचवल्याबद्दल महेश भट्ट यांचे आभार मानले आहेत.

  • सुशांतवर प्रेम केले हा गुन्हा केला

सुशांतच्या वडिलांनी रियावर त्यांच्या मुलाला विष दिल्याचा आरोप केला आहे. 'माझा एकच गुन्हा झाला मी सुशांतवर प्रेम केले. तपासकार्यात मला जे काही विचारण्यात आले त्याची मी सगळी उत्तरे दिली आहेत. काहीच लपवले नाही', असे रियाने म्हटले आहे.

  • डेटा डिलीट केल्याच्या बातमीचे केले खंडन

मीडिया रिपोर्टनुसार, रियाने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडण्यापूर्वी आयटी प्रोफेशनलला कॉल करून 8 हार्ड डिस्कमधील डेटा डिलीट केला होता. सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशीत हा खुलासा केला आहे. पण खुद्द रियाने हा आरोप फेटाळून लावला आहे. ती म्हणाली, "या आरोपात तथ्य नाही. माझ्या माहितीनुसार तेथे हार्ड डिस्क नव्हती आणि मी तिथे असतांना कोणीही तिथे आले नव्हते. कदाचित मी तिथून गेल्यावर सुशांतच्या बहिणीने कोणाला तरी फोन करुन बोलावले असावे. पण मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला हेसुद्धा माहिती नाही की सिद्धार्थ पिठानी असे काही बोलला आहे."

  • सुशांतच्या कुटूंबाचे आरोप फेटाळून लावले

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप लावला आहे. यासह सुशांतचे आयुष्यावर नियंत्रण ठेवणे, त्याचा स्टाफ बदल्याचाही आरोप तिच्यावर केला आहे. रियानेही हे दावे देखील फेटाळले आहेत. ती म्हणते, "मी त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीही केले नाही. तो माझ्या आधीपासून सिद्धार्थ पिठानीला ओळखत होता. सॅम्युअल मिरांडा (मॅनेजर) ची सुशांतची बहीण प्रियंकाने नियुक्ती केली होती. केशव (कुक), नीरज (हाऊस किपर) ) आणि दीपेश सावंत तिथे माझ्या आधीपासून होते. सुशांतनेच त्यांच्याशी माझ्याशी ओळख करून दिली होती."