आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड राहिलेली रिया चक्रवर्ती हिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिया पुन्हा एकदा प्रेमात पडली असून सध्या एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचा मालक बंटी सजदेहला डेट करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण आता दोन वर्षांनी तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला आहे.
बंटी आणि रिया एकमेकांना डेट करत असून सध्या त्यांना त्यांच्या रिलेशनशिपबाबत गुपित कायम ठेवायचे आहे. बंटी सजदेह हा सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही अभिनेता सोहेल खानची पुर्वाश्रमीची पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच सोहेल आणि सीमा वेगळे झाले.
बंटीने रियाला तिच्या वाईट काळात साथ दिली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी आणि रिया एकत्र खूप आनंदी आहेत. रियाच्या अडचणीच्या काळात बंटी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा होता. जेव्हा रिया सुशांत आत्महत्या प्रकरणात अडकली होती, तेव्हा बंटीच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीने रियाच्या सर्व प्रोफेशनल कमिटमेंट सांभाळल्या होत्या.
कोण आहे बंटी सजदेह?
बंटी सजदेह हा स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ आहे. खेळाशी संबंधित लोकांचे प्रोफेशनल कमिटमेंट मॅनेजर करणे हे त्याच्या फर्मचे मुख्य काम आहे. त्याच्या क्लायंटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि युवराज सिंग यासारख्या काही मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय बंटी टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीही चालवतो. तो अनेकदा क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना दिसतो.
रियापूर्वी त्याचे नाव सोनाक्षी सिन्हा आणि सुष्मिता सेनसोबतही जोडले गेले. बंटी सजदेह हा सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा मेहुणाही आहे. सोहेल अलीकडेच त्याची पत्नी सीमा सजदेहपासून वेगळा झाला आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणात रिया चांगलीच अडकली होती
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली तेव्हा सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर सुशांतचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या मृत्यूमागे रियाच कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याशिवाय सुशांतला ड्रग्ज दिल्याचाही आरोप रियावर होता.
या काळात रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना महिनाभर तुरुंगात राहावे लागले होते. पण सुशांतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान, त्याच्या मृत्यूमध्ये रियाचा हात होता हे सिद्ध करणारे पुरावे मिळाले नाही.
2012 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण
रिया चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 2012 मध्ये आलेल्या 'तुनेगा तुनेगा' या तेलुगू चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोनाली केबल, जलेबी या चित्रपटांमध्ये ती झळकली. पण बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. सुशांत सिंग राजपूतसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत राहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.