आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rhea Chakraborty’s Told To Bombay High Court That The Drug Probe Should Be Transferred From NCB To CBI, And That NCB Has No Jurisdiction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाला व्हायचे आहे एनसीबीच्या चौकशीतून मुक्त:रिया कोर्टाला म्हणाली -  माझ्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करा, ती एनसीबीच्या अखत्यारीत येत नाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्ती 8 सप्टेंबरपासून मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे
  • जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 29 सप्टेंबरला होणार आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणातील प्रमुख संशयित असलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान अभिनेत्रीच्या वकिलांनी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे ते सीबीआयकडे सोपवावे.

रिया आणि तिचा धाकटा भाऊ शोविक यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टाला सांगितले की, 'हा खटला (सुशांतचा मृत्यू) सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे भविष्यातील सर्व प्रकरणेही सीबीआयकडे जायला हवी.' रिया गेल्या 17 दिवसांपासून तुरूंगात आहे.

रियावर लावण्यात आलेल्या कलमा या ड्रग्जच्या जास्त प्रमाणासाठी आहेत

एनसीबीने रिया आणि शोविक यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात सतीश मानशिंदे म्हणाले की, एनडीपीएस कायद्याच्या कलम 27A अंतर्गत ड्रग्जची देवाण-घेवाण आणि त्याचे वित्तपुरवठा करणे बेकायदेशीर आहे. परंतु हा कायदा ड्रग्ज व्यावसायिक वापरासाठी आहे, अल्प प्रमाणासाठी नाही.

एनसीबीच्या आतापर्यंतच्या चौकशीला म्हटले बेकायदेशीर

जामीन अर्जामध्ये रिया आणि शोविकच्या वतीने त्यांच्या वकिलांनी म्हटले की, हा तपास एनसीबीच्या कार्यकक्षेत नसल्यामुळे बेकायदेशीर आहे. ते म्हणाले, '1998 च्या राजपत्रात सीबीआयजवळ एनडीपीएस कायद्यांतर्गत ड्रग्जशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकारही आहेत आणि म्हणून आतापर्यंत केलेला तपास हा अवैध आहे.'

मानसिक स्थिती बिघडण्याची भीती

तसेच जामीन याचिकेत रियाने म्हटले की, कोठडी वाढल्याने माझी मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते. जामीन अर्ज तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी दाखल केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यांचे क्लायंट निर्दोष आहेत आणि एनसीबी जाणीवपूर्वक त्यांच्यावर कठोर आरोप करत आहे. त्यांनी केंद्रीय संस्था (एनसीबी, सीबीआय आणि ईडी) च्या तपासाला रियाविरोधातील विच हंट म्हटले आहे.

29 पर्यंत सुनावणी पुढे ढकलली

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती तोपर्यंत तुरूंगातच राहणार आहे. रिया आणि तिच्या भावासह एकूण 16 जणांविरूद्ध एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे आणि 8 सप्टेंबर रोजी अटक झाल्यापासून रिया चक्रवर्ती मुंबईच्या भायखळ्याच्या महिला तुरूंगात आहे.

बातम्या आणखी आहेत...