आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज:नवीन नाही बॉलिवूड आणि ड्रग्जचे नाते; संजय दत्त, फरदीन खानपासून ते रिया चक्रवर्तीपर्यंत सुरू आहे हा सिलसिला

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत प्रकरणात फक्त सीबीआय, ईडीच नव्हे तर एनसीबीसुद्धा अॅक्शनमध्ये आहे.
  • एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि इतरांना अटक केली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवू़ड आणि ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याची हत्या झाली की आत्महत्या याचा छडा लावता लावता हे प्रकरण ड्रग्जपर्यंत येऊन पोहोचले आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह दहा जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. शिवाय चौकशीतून अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना रनोटच्या मते 90% लोक ड्रग्ज घेतात, तर रियाने इंड्रस्ट्रीतील 80% लोक ड्रग्ज घेत असल्याचे म्हटले आहे.

असे मानले जाते की रियाने एनसीबीसमोर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत आणि आता नार्कोटिक्स ब्युरो चौकशीसाठी त्यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटींना आता चौकशीला सामोरे जावे लागू शकते.

तसे पाहता बॉलिवूड आणि ड्रग्जचे नाते नवीन नाही. 70 च्या दशकात बॉलिवूडमधील काही कलाकार अमली पदार्थांचे सेवन करत असतं. मात्र त्यावेळी याचे प्रमाण फार कमी होते. मात्र 80च्या दशकात बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याकाळात कोकेनला सर्वाधिक मागणी असल्याचे बोलले जाते. बॉलिवूडमध्ये तेव्हापासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम असून अनेक जण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक सेलिब्रिटी या प्रकरणात अडकले आणि ड्रग्जचा वापर केला म्ङणून चर्चेत राहिले. एक नजर टाकुयात बॉलिवूडमधील अशाच काही प्रकरणांवर...

  • संजय दत्तने अमेरिकेत जाऊन व्यसनमुक्ती मिळाली

ड्रग अॅडिक्शन प्रकरणात सर्वात पहिले नाव समोर आले होते ते अभिनेता संजय दत्तचे. 1980 च्या दशकात संजय दत्त ड्रग्जच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याला अमेरिकेत व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात आले होते. इतकेच नाही तर 1982 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याला पाच महिन्यांची शिक्षा देखील झाली होती. त्याच्या आयुष्यावर बेतलेल्या संजू या चित्रपटात ड्रग्जपासून तो कसा मुक्त झाला हे दाखवले गेले होते. संजय दत्तने अनेकदा जाहिररित्या ड्रग्ज घेतल्याची कबुलीदेखील दिली आहे. आता संजय दत्त आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या ड्रग फ्री इंडिया कॅम्पेनचा सदस्य आहे.

  • फरदीन खानला 2001 मध्ये झाली होती अटक

बॉलिवूड अभिनेता फरदीन खानला एक ग्रॅम कोकेन खरेदी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. फरदीनवर एनडीपीएस कायद्यान्वये कलम 21 (अ) आणि कलम 28 ((सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये विशेष कोर्टाने फरदीनची यातून मुक्तता केली आणि त्यानंतर तो व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेतून गेला.

  • अबू धाबीमध्ये विजय राजजवळ सापडला होता मारिजुआना

अभिनेता विजय राजला अबू धाबी येथे ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. ही 14 फेब्रुवारी 2005 रोजीची घटना आहे. युएईमध्ये विजय राज विक्रम भटच्या दिवाने हुये पागल या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत 6 ग्रॅम गांजा सापडला होता. मात्र तो आपल्या बॅगेत कसा आला हे माहित नसल्याचा दावा त्यावेळी विजय राजने केला होता. त्यानंतर त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

  • प्रतीक बब्बरने ड्रग्ज घेतल्याची दिली होती कबुली

चित्रपट अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदा ड्रग्जचे सेवन केले होते. मिडडेमध्ये लिहिलेल्या एका खुल्या पत्रात त्याने लिहिले होते की, याची सुरुवात गांजा आणि चरसपासून झाली. मग ही नशा कोकेन आणि अॅसिडपर्यंत पोहोचली होती.

ममता कुलकर्णीवर अमली पदार्थाच्या तस्करीचा आरोप

ममता कुलकर्णीवर 2000 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. जानेवारी 2016 मध्ये, केनियात पती विक्की गोस्वामीबरोबर ड्रग स्मगलर्सच्या मीटिंगला ती उपस्थित होती. विक्की गोस्वामी हा भारतातील सर्वात मोठ्या अमली पदार्थांच्या तस्करांपैकी एक मानला जातो. मात्र, ममताने हे आरोप फेटाळून लावले.

  • हनी सिंग औषधोपचारांनंतर व्यसनातून मुक्त झाला

तरुणांमध्ये लोकप्रिय हनी सिंगच्या गाण्यातच ड्रग्जचा उल्लेख आहे. हनी सिंगलाही दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन होते. मधला बराच काळ तो गायब होता. याकाळात तो व्यसनमुक्तीसाठी उपचार घेत असल्याचे समोर आले. या व्यसनांचा हनी सिंगच्या कारकीर्दीवर वाईट परिणाम झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...