आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आता अमली पदार्थांच्या अंगलने चौकशी सुरु झाली आहे. दिव्य मराठीजवळ रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज कनेक्शनशी निगडीत चॅट आहेत. यामध्ये ती गौरव नावाच्या व्यक्तीशी ड्रग्जविषयी बोलत आहे. मात्र, आजपर्यंत रियाने एकदाही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असा दावा तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे. यासाठी कोणतीही टेस्ट द्यायला ती तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विटरवर लिहिले की, ड्रग्ज बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे.
रियाचे ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देखील या तपासात सामील झाले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत एनसीबीची टीम रियाची चौकशी करू शकते.
रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी आपल्या फोनमधून डिलीट केले होते. पहिला चॅट रिया आणि गौरव आर्य नावाच्या व्यक्तीतील आहे. गौरव हा ड्रग्ज डीलर असल्याचे सांगितले जात आहे. रिया आणि सुशांत सिंह राजपूत हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सर्वप्रथम एप्रिल 2019 मध्ये समोर आले होते. तेव्हापासून ती सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. 8 जून रोजी तिने अचानक सुशांतचे घर सोडले आणि 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रेस्थित फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.
पहिला चॅट: (रियाने गौरवला केला होता) 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठविलेल्या या चॅटमध्ये रियाने लिहिले की, 'जर आपण हार्ड ड्रग्जविषयी बोलत असून तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही'
दुसरा चॅट: (रियाने गौरवला केला होता) यामध्ये रिया गौरवला विचारते, 'तुझ्याजवळ एमडी आहे का?' येथे एमडीचा अर्थ 'मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन' असा आहे, हा एक ड्रग्जचा प्रकार आहे.
तिसरा चॅट : 8 मार्च 2017 रोजी या चॅटमध्ये रिया गौरवला म्हणाली, "जास्त नशा असलेल्या ड्रग्जविषयी बोलायचे झाल्यात तर मी ते जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेतले होते.' रियाने ड्रग्ज घेतल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर ती गौरवला विचारते, "तुझ्याजवळ एमडी आहे का?"
चौथे चॅट: (हा चॅट सॅम्युअल मिरांडा आणि रिया यांच्यातील आहे) : 17 एप्रिल 2020 च्या या चॅटमध्ये सॅम्युअल मिरांडा म्हणतो, "हाय रिया, स्टाफ जवळजवळ संपला आहे." "मग मिरांडा रियाला विचारतो, "आपण हे शोविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का?, पण त्याच्याकडे फक्त 'हॅश' आणि 'बड' आहे.' हे दोन्ही सामान्य ड्रग्ज मानले जातात.
या चार चॅटवरुन रिया 2017 पासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. ताज्या चॅटमध्ये मात्र रिया स्वतःसाठी ड्रग्ज मागवतेय की दुस-या कुणासाठी हे स्पष्ट झालेले नाही.
10 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने रिया आणि तिच्या कुटुंबीयांचे 4 मोबाइल हँडसेट जप्त केले होते. यातील दोन फोन रियाचे असून उर्वरित दोन तिच्या वडील आणि भावाचे आहेत. दोन आयपॅड आणि एक लॅपटॉपही ईडीने ताब्यात घेतला. या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. या तपासणी दरम्यान ड्रग्ज अँगल उघड झाल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणात रिया आणि तिच्या भावाव्यतिरिक्त ईडी आतापर्यंत सुशांतचे वडील केके सिंह, बहीण प्रियंका, मितू, रिया चक्रवर्तीच्या कुटुंबातील सदस्य, चित्रपट निर्माते रुमी जाफरी, सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांची चौकशी केली आहे.
सुशांतच्या घरी दर आठवड्याला होणा-या पार्टीत दारू आणि गांजाचे सेवन सेवन केले जात होते, असे सुशांतच्या स्वयंपाक्याने सीबीआय चौकशीत यापूर्वी सांगितले होते. 14 जून रोजी सुशांतने राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गांजाचे सेवन केले होते. इतकंच नाही तर सुशांतने मृत्युपूर्वी सलग तीन दिवस गांजा ओढला होता, असे नीरजने केलेल्या दाव्यात म्हटले आहे. सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी घरी पार्टी करायचा. या पार्टीत रिया, आयुष असायचे आणि बऱ्याच वेळा या पार्टीत ते दारू, गांजा, सिगारेट ओढायचे. तसंच सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजाचा रोल तयार करुन द्यायचे. कधी-कधी मीदेखील तयार करुन द्यायचो. इतकंच नाही तर सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी गांजाचे रोल केले होते. हे रोल तो कायम घरात असलेल्या जिन्याच्या खालच्या कपाटात ठेवत असते. त्यामुळे सुशांतचे निधन झाल्याचे लक्षात येताच प्रथम मी कपाटातील गांजाचा बॉक्स पाहिला. मात्र त्यातले सगळे रोल संपले होते, असे नीरजने चौकशीत सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.