आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साइडइफेक्ट:सुशांतच्या निधनानंतर वादाच्या भोव-यात अडकलेल्या रियाचा चेहरा 'चेहरे'च्या पोस्टरवरुन गायब, मित्र म्हणाला - तिने स्वप्नातही असा विचार केला नव्हता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये रियाने रूमी जाफरी दिग्दर्शित चित्रपटासाठी शूटिंग केले होते

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर वादाच्या भोव-यात अडकलेली रिया चक्रवर्तीला खासगी आयुष्यासोबतच प्रोफेशनल लाइफमध्येही जनतेच्या नाराजीचा फटका सहन करावा लागतोय. एकीकडे तिला चित्रपट मिळत नाहीये, तर दुसरीकडे जे चित्रपट तिच्या हातात आहे, त्यातही तिच्या सीनवर कात्री फिरताना दिसत आहे. ताजे उदाहरण म्हणजे आगामी चित्रपट 'चेहरे'. प्रेक्षकांची नाराजी सहन करावी लागू नये, म्हणून निर्मात्यांनी रियाचा चेहरा पोस्टरवर वापरला नाही. याबाबतीत निर्माते आनंद पंडित आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्यासह चित्रपटाच्या उर्वरित टीमनेही मौन बाळगले आहे. त्यांच्या वतीने कुणी काही बोलण्यास तयार नाही.

रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता
रिया चक्रवर्तीच्या मित्राच्या हवाल्याने स्पॉटबॉयने आपल्या वृत्तात लिहिले की, "आपल्या बाबतीत असे काही घडेल, याचा रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता. 2020 मध्ये रियाला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि आता ती आपले आयुष्य पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता या सर्व गोष्टींचा तिला त्रास होईल. सध्या तिचे बॉलिवूडमध्ये स्वागत नाही, असेच चित्र दिसतंय," असे रियाच्या मित्राने म्हटले आहे.

पोस्टरवर दिसले चित्रपटातील सर्व कलाकारांचे चेहरे
अलीकडेच 'चेहरे' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा आणि बंगाली चित्रपट अभिनेता धृतिमान चटर्जी झळकले होते. पण पोस्टरवरून रिया चक्रवर्तीचा चेहरा गायब होता. 2019 मध्ये रियाने रूमी जाफरी दिग्दर्शित चित्रपटासाठी शूटिंग केले होते आणि त्यावेळी तिने फर्स्ट लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

हा चित्रपट येत्या 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय.

बातम्या आणखी आहेत...