आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियासमोर नवीन अडचण:मुंबईत नव्या घराच्या शोधात आहे रिया चक्रवर्ती, घराच्या शोधात फिरताना दिसले आईवडील

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुंगातून परतल्यानंतर आता चक्रवर्ती कुटुंबावर सोसायटीकडून घर सोडण्याचा दबाव टाकला जातोय.

ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पुन्हा एकदा नवीन अडचणीत सापडली आहे. कुटुंबासह घराच्या शोधात फिरतानाचा रियाच्या आईवडिलांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील खास परिसरात रियाचे आईवडील घर शोधताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबाला सोसायटीने घर रिकामे करण्यास सांगितले आहे. त्यामुळे रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि आई संध्या चक्रवर्ती सध्या घराचा शोधात फिरत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना ड्रग्जचा वापर व खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात 8 सप्टेंबरला अटक झालेल्यानंतर 30 दिवसांनी रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाला होता.

प्रसार माध्यमांच्या गर्दीमुळे सोसायटीचे सदस्य संतप्त झाले होते
सध्या रिया तिच्या कुटुंबासह सांताक्रूझ येथे राहते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर तिच्या फ्लॅटबाहेर दररोज प्रसार माध्यमांची गर्दी असायची. त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे.

प्रसार माध्यमांपासून बचाव करण्यासाठी नवीन घराचा शोध
ऑगस्ट महिन्यात रिया चक्रवर्तीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तिच्या इमारतीच्या खाली मीडियाच्या फोटोग्राफर्सची गर्दी दिसली होती. यानंतर रियाने मुंबई पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली होती. रिया तुरुंगातून परत आल्यानंतरही पैपाराजी अनेकदा तिचा पाठलाग करताना दिसत असतात. त्यामुळे याला कंटाळून रिया आणि तिचे कुटुंब नवीन घर शोधत असल्याचेही म्हटले जात आहे.

सुशांतच्या मृत्यूच्या 6 महिन्यांनंतरही अद्याप उकलले नाही कोडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, परंतु सीबीआय, ईडी आणि एनसीबी अद्याप या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सुशांतची हत्या होती की आत्महत्या याचा खुलासा अद्याप सीबीआयने केला नाही. सूत्रांचा माहितीनुसार, सीबीआयला या प्रकरणात हत्येचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...