आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रियाला मिळाला क्वारंटाइन बॅरेक:कारागृहातील 10x10 या बॅरेकमध्ये असते अटॅच बाथरुम, मगमध्ये मिळते पिण्याचे पिणे; जमिनीवर झोपावे लागते

ज्योति शर्मा, मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहातील क्वारंटाइन बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.
  • तिला जामीन मिळाला नाही तर तिला परमनंट बॅरेक दिले जाऊ शकते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबईच्या भायखळा तुरुगांत हलविण्यात आले आहे. या कारागृहातील महिला जेलमध्ये तिला ठेवण्यात आले आहे. येथे तिला वेगळे बॅरेक देण्यात आले आहे. जेलच्या मॅन्युअलनुसार नवीन कैद्याला तात्पुरते बॅरेक देण्यात येते, त्याला क्वांरटाइन बॅरेक असे म्हटले जाते. जर रियाला जामीन मंजुर झाला नाही तर तिला परमनंट बॅरेक दिले जाईल.

हे बॅरेक कसे असते?

  • हे बॅरॅक 10 बाय 10 किंवा जास्तीत जास्त 15 चा असतो. यात बाथरुम अटॅच असते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मग किंवा माठात केलेली असते. खोलीत एक सिलिंग फॅन असतो.
  • बॅरेकमध्ये एक उशी, एक चटई, त्यावर टाकण्यासाठी एक चादर आणि ब्लँकेट असते. बॅरेकमध्ये पलंग नसतो. त्यामुळे कैद्याला जमिनीवर झोपावे लागते. स्वतःचे अंथरुण त्याला स्वतः घालावे लागले.
  • कैद्याला तुरुंगातील जेवण दिले जाते. परंतु विचाराधीन असलेल्या कैद्याला घरचे जेवण देखील देण्याची सोय असते. एनसीबीच्या लॉकअपमध्ये रियासाठी ही व्यवस्था होती.

रियावर कुठले कलम लागले आहेत

  • रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कलम 8 (C), 20 (B) (ii), 27(A), 28 & 29 एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली आहे. यापैकी 8 (C) कलम ही प्रतिबंधित ड्रग्जची बेकायदेशीर खरेदी आणि वापरासाठी वापरली जाते. ही कलम रियाच्या बाबतीत सिद्ध झाली आहे. ती ड्रग्ज विकत घ्यायची आणि त्यासाठी तिने सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि तिचा भाऊ शोविक यांचा वापर केला. या कलमांतर्गत तिला किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  • कलम 20 (B) (ii) गांजाच्या ट्रान्सपोर्टेशनशी संबंधित आहे, परंतु त्यात जामीन मिळू शकतो.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे सेक्शन 27 ( A), हे रियासाठी डोकेदुखी ठरले आहे. त्याअंतर्गत ना त्याला एनसीबी कोर्टाकडून जामीन मिळाला, ना सत्र न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. आरोपीवर ही कलम ड्रग्ज किंवा अमली पदार्थ जवळ बाळगणे, विक्री करणे किंवा त्यासाठी वित्त पुरवणे या कारणांसाठी लावली जाते. त्याअंतर्गत आरोपीला दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
  • कलम 28 हा गुन्हेगारी अधिनियम / बेकायदेशीर कृत्याशी संबंधित आहे, तर कलम 29 मध्ये गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप लावला जातो.