आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rhea Chakraborty Grabbed Sushant Singh Rajput Money | Nitish Kumar Bihar Government Filed Affidavit In Supreme Court In Sushant Singh Rajput Suicide Case

सुशांत आत्महत्या प्रकरण:बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले शपथपत्र -  रियाने पैसे हडपण्यासाठी सुशांतला दिला होता औषधांचा ओव्हरडोज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले- सुशांतला मानसिक आजार नव्हता, रियाने त्याच्या आजाराचे खोटे चित्र निर्माण केले होते.
  • सुशांत सिंहने 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यामध्ये रियावर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. रियाने सुशांतची संपत्ती आणि पैसा हडपण्याचा प्रयत्न केल्याचे बिहार सरकारच्या वतीने म्हटले गेले आहे.

राज्य सरकारने सांगितले की, सुशांतला मानसिक आजार नव्हता. रियाने त्याच्या आजाराचे खोटे चित्र निर्माण केले होते. त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचा या प्रकरणाच्या चौकशीत पाठिंबा मिळाला नाही. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत चौकशीसाठी गेले होते. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य सुशांतच्या संपर्कात फक्त त्याचा पैसा हडपण्यासाठी आले होते, असे म्हटले गेले आहे.

दुसरीकडे, हा खटला पाटण्यामधून मुंबईत वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर 5 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यावर न्यायालयाने केंद्र, महाराष्ट्र, बिहार सरकार व सुशांतच्या कुटुंबाकडून 3 दिवसांच्या आत म्हणणे मागवले आहे.

  • सुशांतच्या वडिलांनी 25 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता

14 जून रोजी सुशांत सिंहने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे एक महिन्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी रिया, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, दोन मॅनेजर सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिस मुंबईला गेले. मुंबई पोलिसांचा पाठिंबा न मिळाल्यानंतरही पाटणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. सुरुवातीला चार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी गेलेले एसपी विनय तिवारी यांना मुंबईत जबरदस्तीने क्वारंटाइन ठेवण्यात आले. चार पोलिस अधिकारी गुरुवारी पाटण्याला परतले. तर विनय तिवारी यांनाही क्वारंटाइनमधून मुक्त करण्यात आले असून ते आज पाटण्यात परतणार आहेत.

  • बिहार सरकारने सीबीआय चौकशीची मागणी केली होती

या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी शिफारस बिहार सरकारने बुधवारी केली होती. ती केंद्राने मान्य केली आहे. सीबीआयने सुशांतची मैत्रिणी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांना आरोपी बनवले आहे. सीबीआयने भादंवि कलम 306, 341, 342, 420, 406 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...