आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:रिया चक्रवर्तीच्या दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ; हायकोर्टात जामिनासाठी केला अर्ज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

  • रियाची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज (मंगळवार) पूर्ण संपणार होती. रियाला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.

रियाला अटक झाल्यानंतर तिने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यावेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. तसंच जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

  • ड्रग्जची देवाण- घेवाण करण्यात मदत केल्याचे रियाने केले आहे मान्य

रियाने एनसीबीकडे स्वतःचा गुन्हा मान्य केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. ड्रग्जच्या देवाण- घेवाणीत तिचा हात असल्याचे रियाने मान्य केले होते. इतकेच नाही तर रियानेही ती ड्रग पेडलर्सच्या सतत संपर्कात होती हेही मान्य केले. या कबुली जबाबानंतर रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान रियाने फक्त स्वतःचाच गुन्हा कबुल केला नाही तर इतर 25 बॉलिवूड सेलिब्रिटींचीही नावे घेतली आहेत.