आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रियाने सुशांतसोबत लिव्ह इनमध्ये राहिल्याचे केले मान्य, म्हणाली - तो डिप्रेशनमध्ये होता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या याचिकेत रियाने मागणी केली की, या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी नव्हे तर मुंबई पोलिसांनीच करावा.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती वादात अडकली आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली असून तिच्यावर गंभीर आरोप केले आहे. आता या प्रकरणी रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी नव्हे तर मुंबई पोलिसांनीच करावा, अशी मागणी करणारी याचिका रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तिच्या वतीने दाखल केली आहे.

 • एक वर्ष होते लिव्ह इनमध्ये

या याचिकेत रियाने ती आणि सुशांत हे वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते, त्यावेळी सुशांत डिप्रेशनमध्ये होता, अशी माहिती दिली आहे. सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आठवडाभरापूर्वी म्हणजे 8 जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले होते. त्यानंतर ती तिच्या सांताक्रूझ येथील घरी राहायला गेली होती. सुशांतच्या वडिलांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

 • मुंबई पोलिसांनीच करावा तपास

या याचिकेत रियाने मागणी केली की, या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी नव्हे तर मुंबई पोलिसांनीच करावा. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची पाटण्यात खूप ओळख आहे. त्यामुळे बिहार पोलिस या प्रकरणी योग्य तपास करतील, यावर विश्वास नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

 • सुशांतच्या वडिलांनी उपस्थित केले हे 7 प्रश्न

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून पाटण्याच्या राजीव नगर पोलिसांनी सहा जणांवर भांदवी कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 • 2019 पूर्वीपर्यंत सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक मानसिक आजार कसा झाला?
 • जर तो उपचार घेत असेल तर मग आमच्याकडून लेखी किंवा तोंडी मान्यता का घेतली गेली नाही, जी आवश्यक असते?
 • सुशांतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोणती औषधे दिली होती, ते देखील या कटात सामील आहेत का?
 • सुशांतची मानसिक स्थिती गंभीर असताना रियाने त्याला योग्य वागणूक का दिली नाही, ती त्याचे मेडिकल कागदपत्रं आपल्यासोबत का घेऊन गेली?
 • सुशांतच्या बँक खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी एका वर्षामध्ये सुमारे 15 कोटी रुपये काढण्यात आले, हे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले?
 • सुशांतने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. मग अचानक असे काय झाले की रियाच्या येणा-यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले?
 • सुशांत त्याचा मित्र महेशसोबत मिळून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीसाठी जमीन पाहात होता, तेव्हा रियाने त्याला ब्लॅकमेल केले?