आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:रियाची सर्वोच्च न्यायालयात धाव - प्रकरण पाटणा येथून मुंबईत हलवण्याची केली मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतच्या वडिलांनी रियासह सहा जणांवर पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 • अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रियाने तिचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत पाटणा येथे तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला खटला मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पाटणा पोलिस तिचा शोध घेत असून तिच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने रियाने हे पाऊल उचलले आहे.

यापूर्वी सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रियाविरूद्ध अजामीनपात्र कलमही लावले आहेत.

 • अटकेच्या भीतीने रिया गायब झाली

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबीयांना अटक होण्याची शक्यता आहे. बुधवारी पाटणा पोलिस चौकशीसाठी तिच्या पत्त्यावर पोचले होते. मात्र ामहिती देणअयासाठी तिच्या घरी कुणीही हजर नव्हते.

यानंतर बिहार पोलिस मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. येथे सुशांतच्या माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येसंबंधीचा तपशील, तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक व्हिसेरा रिपोर्टही बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून घेतला आहे. या प्रकरणात सुशांतच्या सीएची बिहार पोलिस चौकशीही करणार असल्याचे बोलले जात आहे.

 • बँकेचे तपशील तपासणार पाटणा पोलिस

मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचलेल्या पाटणा पोलिसांच्या एका अधिका्याने सांगितले की, आम्ही महिला पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या इतर लोकांना भेटत आहोत. सुशांतच्या बँक खात्यांचे तपशील तपासले जाणार आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा पोलिसांचे चार जणांचे पथक मुंबईत दाखल झाले आहेत.

 • सुशांतच्या बहिणीसह त्याच्या फ्लॅटवर जाणार पाटणा पोलिस

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे पोहोचलेली पाटणा पोलिसांची टीम सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटलाही भेट देणार आहे. या दरम्यान त्याची बहीण मितू आणि त्याचा मित्र महेशही हजर असतील. महेश तीच व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मिळून सुशांत केरळच्या कुर्गमध्ये सेंद्रिय शेती करणार होता.

 • पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर भांदवी कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एलजेपी नेते चिराग पासवान यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एफआयआरमध्ये सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर 7 आरोप केले आहेत:

 • 2019 पूर्वीपर्यंत सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक मानसिक आजार कसा झाला?
 • जर तो उपचार घेत असेल तर मग आमच्याकडून लेखी किंवा तोंडी मान्यता का घेतली गेली नाही, जी आवश्यक असते?
 • सुशांतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोणती औषधे दिली होती, ते देखील या कटात सामील आहेत का?
 • सुशांतची मानसिक स्थिती गंभीर असताना रियाने त्याला योग्य वागणूक का दिली नाही, ती त्याचे मेडिकल कागदपत्रं आपल्यासोबत का घेऊन गेली?
 • सुशांतच्या बँक खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी एका वर्षामध्ये सुमारे 15 कोटी रुपये काढण्यात आले, हे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले?
 • सुशांतने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. मग अचानक असे काय झाले की रियाच्या येणा-यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले?
 • सुशांत त्याचा मित्र महेशसोबत मिळून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीसाठी जमीन पाहात होता, तेव्हा रियाने त्याला ब्लॅकमेल केले?