आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवत आहे ईडी, भावाची दोन तास चौकशी झाली; सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीला देखील बोलावले

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंहची मैत्रीण रियावर सुशांतच्या बँक खात्यातील 15 कोटी रुपये स्वतःच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोप आहे.
  • दरम्यान, पाटणा एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंटाइनमधून मुक्त केले असून ते आज पाटण्याला परतणार आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारात रिया तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्यासह येथे पोहोचली. शोविकची जवळजवळ दोन तास चौकशी झाली. मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात ईडी काम करत आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने केली होती. मात्र तिची ही विनंती फेटाळून लावण्यात आली. सुशांतच्या खात्यामधून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी तिची ईडीकडून आज चौकशी झाली.

ईडीच्या कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती
ईडीच्या कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती

दरम्यान, ईडीने सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिलादेखील आज चौकशीसाठी बोलावले आहे. 8 ऑगस्ट रोजी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची चौकशी केली जाईल. रियाने पाटणा येथील तिच्यावरील खटला मुंबईत वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले. तसंच सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

रियाला हे प्रश्न ईडी विचारू शकतात

1. आपल्या कुटुंबातील लोक कोणता व्यवसाय करतात? आपले आणि कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे आणि उत्पन्न किती आहे?

2. तुम्ही किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहात आणि या कंपन्यांमध्ये तुमच्या कुटुंबाचा काही वाटा आहे का?

3. रियाच्या कंपन्यांचे टर्नओव्हर आणि तिच्या चित्रपटांच्या कमाई बद्दल ईडी चौकशी करू शकते?

4. ईडी रियाला तिच्या बँक खात्यांचा तपशील आणि तिने किती बँकांमध्ये किती रक्कम जमा केली आहे याबद्दल तपशील विचारू शकते.

5. तुमच्या नावावर किती मालमत्ता आहेत आणि ही संपत्ती कुठे आहे? सुशांत सिंह राजपूत यांनी या मालमत्तांमध्ये पैसे गुंतवले होते का?

6. आपण सुशांतच्या आर्थिक घडामोडींवर पूर्णपणे नजर ठेवली होती का? आपण यासाठी एखादी आर्थिक फर्म किंवा सीएची मदत सहारा घेतली होती का?

7. आपण कोणत्या नात्याने सुशांतचे बँक खाते ऑपरेट करत होत्या? सुशांतने आपल्याला लेखी किंवा तोंडी रित्या खाती चालवण्यास मान्यता होती का?

  • पाटणा एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने मुक्त केले

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधऊन मुक्त केले आहे. ते आज पाटण्याला रवाना होऊ शकतात. बीएमसीने रविवारी जोगेश्वरी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये त्यांना क्वारंटाइन केले होते. त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्कादेखील लावला होता. क्वारंटाइनमधून सुटकेच्या वेळी, बीएमसीकडून त्यांना सांगण्यात आले की, ते लॉकडाऊन नियमांचे पालन करून लोकांची चौकशी करू शकतात.

  • बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले

दुसरीकडे या प्रकरणात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यामध्ये रियावर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. रियाने सुशांतची संपत्ती आणि पैसा हडपण्याचा प्रयत्न केल्याचे बिहार सरकारच्या वतीने म्हटले गेले आहे. राज्य सरकारने सांगितले की, सुशांतला मानसिक आजार नव्हता. रियाने त्याच्या आजाराचे खोटे चित्र निर्माण केले होते. त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचा या प्रकरणाच्या चौकशीत पाठिंबा मिळाला नाही. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत चौकशीसाठी गेले होते. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य सुशांतच्या संपर्कात फक्त त्याचा पैसा हडपण्यासाठी आले होते, असे म्हटले गेले आहे.

हा खटला पाटण्यामधून मुंबईत वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर 5 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यावर न्यायालयाने केंद्र, महाराष्ट्र, बिहार सरकार व सुशांतच्या कुटुंबाकडून 3 दिवसांच्या आत म्हणणे मागवले आहे.

  • सीबीआयने एफआयआर नोंदवला

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद स्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणात केंद्राची अधिसूचना जारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयने हे प्रकरण आपल्या हातात घेतले. तपास संस्थेने एफआयआर दाखल केला आहे. तपासासाठी विशेष पथक (एसआयटी) बनवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या एसआयटीने मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या आणि व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कराराचा तपास केला होता, त्याच पथकाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे.

सूत्रांनी सांगितले की, या एसआयटीचे नेतृत्व गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर यांच्याकडे असेल. त्यांच्यासोबत गुजरात केडरच्याच महिला आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर आणि अनिल यादव असतील. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, बिहार पोलिसांनी रिया आणि इतर पाच जणांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात आतापर्यंत केलेला तपास आणि चौकशीचा तपशील सीबीआयला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...