आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज केसमध्ये रकुलचे कनेक्शन:रिया चक्रवर्तीची जिम पार्टनर होती रकुलप्रीत सिंग, एक्स्ट्रा पॉकेट मनीसाठी केला होता पहिला चित्रपट, साऊथमध्ये हिट मात्र बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी रकुल हैदराबादला शिफ्ट झाली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला तुरुंगात आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की रियाने 25 बॉलिवूड सेलेब्सची नावे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला दिली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रियाने अभिनेत्री सारा अली खान, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा, सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांची नावे घेतली आहेत. विशेष म्हणजे रकुल आणि रिया जिम पार्टनर होत्या. अनेकदा मुंबईतील जिममध्ये त्यांना एकत्र पाहिले गेले आहे.

ड्रग्ज प्रकरणात रकुलचे नाव येताच ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. एक नजर टाकुया तिच्याशी संबंधित काही फॅक्ट्सवर...

  • दिल्लीत लहानाची मोठी झाली रकुल

30 वर्षीय रकुल हा दिल्लीच्या पंजाबी कुटुंबातील आहे. तिच्या वडिलांचे नाव राजेंद्र सिंग आणि आईचे नाव कुलविंदर सिंग आहे. वडिलांच्या नावातील 'र' आणि आईच्या नावातील 'कुल' हे शब्द जोडून तिचे नाव रकुल ठेवले गेले.

- रकुलने आपले शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल, धौलाकुआं, दिल्ली येथून केले. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. रकुलने जीसस अँड मेरी कॉलेज, दिल्लीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

  • पहिला चित्रपट पॉकेटमनीसाठी केला होता

रकुलची कॉलेजपासूनच अभिनेत्री व्हायची इच्छा होती. यामुळेच तिने कॉलेजमध्ये असताना वयाच्या 18 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. 2009 मध्ये तिने कन्नड चित्रपट गिल्लीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

- रकुलने एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी हा चित्रपटात साइन केले होता. दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्री किती मोठी आहे हे देखील तिला त्यावेळी माहित नव्हते. गिल्ली या चित्रपटातील भूमिकेबद्दल रकुलचे कौतुक झाले. 2011 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला ज्यात तिने पाच टायटल आपल्या नावी केले.

  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कमावले नाव

- यानंतर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी रकुल हैदराबादला शिफ्ट झाली. तिने केरतम हा तेलुगु चित्रपट आणि ठदाईयारा या तामिळ चित्रपटांद्वारे पदार्पण केले. त्यानंतर वेंकटद्री एक्सप्रेस, करेंट थीगा, रफ, किक 2, ध्रुवा, स्पायडर या चित्रपटांमध्ये ती झळकली.

- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर 2017 मध्ये तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने रकुलची निवड बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली.

  • बॉलिवूडमध्ये केला डेब्यू

दक्षिणेत हिट झाल्यानंतर रकुलने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यारियां हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता जो फ्लॉप ठरला. चार वर्षांनंतर ती अय्यारीमध्ये दिसली.

-2019 'दे दे प्यार दे', 'मरजावां'मध्येही ती झळकली. 2020 मध्ये तिचा 'शिमला मिर्च' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

-रकुल फिटनेस फ्रीक आहे. ती दोन जिमची मालक आहे. एक जिम हैदराबाद आणि दुसरे विशाखापट्टणममध्ये आहे.

- ती राष्ट्रीय पातळीवरील गोल्फपटू आहे. तिने स्पोर्ट्समध्ये आपले करियर बनले नाही कारण तिला शोबीजमध्ये यायचे होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser