आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:सहा महिन्यांनी सोशल मीडियावर परतली रिया चक्रवर्ती, आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवळपास 6 महिन्यांनी रियाने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत सोशल मीडिया पोस्ट केलीय.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. मागील सहा महिन्यांपासून रिया सोशल मीडियापासून दूर होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रियाने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासह एक इमोशनल मेसेज लिहिला आहे. या फोटोत तिने तिच्या आईचा हात आपल्या हातात घट्ट पकडलेला दिसतोय. 'आम्हाला महिला दिनाच्या शभेच्छा.. आई आणि मी.. कायम एकत्र..माझी ताकद, माझा विश्वास,माझं मनोबलं – माझी आई,' अशा आशयाचे कॅप्शन रियाने दिले आहे.

27 ऑगस्ट 2020 रोजी अखेरची केली होती पोस्ट

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासून दूर गेली होती. सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर ती सोशल मीडियावर परतली होती, पण तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिला
प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

27 ऑगस्ट रोजी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने तिच्या घराबाहेर जमा झालेल्या मीडियाच्या गर्दीवर आक्षेप नोंदवला होता. माध्यमांच्या लोकांमुळे कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याचे सांगत तिने एक व्हिडिओ शेअर केला होता.

NCB ने दाखल केलेल्या आरोपपत्रात रियाच्या नावाचा उल्लेख
दरम्यान, सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी न्यायालयासमोर 12 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 12 हजार पानांच्या या आरोप पत्रांमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह 33
जणांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबी काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावे यात आहेत. एनसीबीने 200 जणांचे जबाब नोंदवले असून, 12 हजार
पाने आणि 50 हजार पाने डिजिटल स्वरूपात हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला

सुशांत सिंह राजपूत मागीलवर्षी 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होते. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस, बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबी यांनी केला होता, परंतु अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपासादरम्यान एनसीबीने बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आणि दीपिकासह अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...