आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच 'रोडीज सीझन 19'मधून छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यासह रिया या गँगचे नेतृत्व करणार आहे. वाहिनीने शोचा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये रिया ब्लॅक आउटफिटमध्ये नवीन अंदाजात दिसत आहे.
व्हिडिओमध्ये रिया म्हणतेय – 'तुम्हाला काय वाटले मी परत येणार नाही, मी घाबरेल... आता घाबरणार दुसरंच कुणी... भेटूया ऑडिशनला..'
'रोडीज कर्म या कांड'चा एक भाग होण्यासाठी मी एक्साइडेट - रिया
शोमधून टीव्हीवर पुनरागमन करण्याबाबत रिया म्हणाली- "'रोडीज कर्म या कांड'चा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मी सोनू सूद आणि इतर गँगच्या नेत्यांसोबत काम करण्यासही उत्साहित आहे. माझ्या या नव्या प्रवासात मला माझ्या चाहत्यांचे भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, अशी मी आशा व्यक्त करते."
या प्रोमो व्हिडिओशिवाय, चॅनलने 'रोडीज सीझन 19' ची नवीन थीम 'कर्म या कांड'च्या नवीन थीमचा टिझर देखील जारी केला आहे. या सीझनमध्ये सोनू सूदही दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.