आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हाट्सअॅप चॅटचे आणखी काही नवीन स्क्रीन शॉट्स समोर आले आहेत. हे स्क्रीन शॉट 9 जून ते 15 जून या काळातील आहेत. रियाने 8 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचे घर सोडले होते आणि 9 जून रोजी रात्री 10: 20 वाजता भट्ट यांना मेसेज केला होता, "माझे देवदूत, तुमच्याशिवाय मी काय करु शकले असते. आय लव्ह यू सर. तुम्ही मला पुन्हा एकदा वाचवले", अशा आशयाचा मेसेज रियाने भट्ट यांना केला होता. त्यावर रिप्लाय देताना भट्ट यांनी हात जोडलेला इमोजी शेअर केला आणि रियाने हार्ट इमोजीने त्यांचे आभार मानले होते.
14 जून रोजी दुपारी सर्व न्यूज चॅनेल्स आणि वेबसाइट्सवर सुशांतच्या मृत्यूची बातमी ब्रेक झाल्यानंतर महेश भट्ट यांनी रियाला मेसेज केला होता. दुपारी 2:35 वाजता त्यांनी रियाला 'कॉल मी' (मला कॉल कर) असा मेसेज केला होता. त्यानंतर रियाचे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते की नाही, याचा खुलासा झाला नाही. मात्र संध्याकाळी 4:01 आणि 5: 13 वाजता रियाच्या फोनवर महेश भट्ट यांचे दोन व्हॉईस मिस्ड कॉल आले होते.
सुशांतच्या मृत्यूच्या आधी 14 जून रोजी सकाळी रियाने महेश भट्ट यांना पहिला मेसेज पाठवला होता. त्यात लिहिले होते, "गुड मॉर्निंग सर. मी सकाळच्या कोटमधून तुमच्या ऊर्जेच्या डेली डोसची मागणी करते, जी तुम्ही रोज व्हॉट्सअॅपवर पाठवता. जस्ट लव्ह यू." त्यावर रिप्लाय देताना भट्ट यांनी एक इंग्रजी कोट पाठविला, ज्याचा अर्थ आहे "भावना दाटलेल्या आकाशात ढगांप्रमाणे येत जात असतात. चैतन्य हे माझे अँकर आहे."
त्यानंतर रियाने हात जोडलेल्या इमोजीद्वारे त्यांचे आभार मानले. त्यानंतर महेश भट्ट यांनी लिहिले, "लव्ह यू चाईल्ड" आणि रियाने हार्टच्या इमोजीसह "लव्ह यू सर माय एंजल" असा रिप्लाय दिला होता. भट्ट आणि रिया यांच्यातील हे सर्व मेसेज सकाळी 9:36 ते सकाळी 10:05 या वेळेतील आहेत.
10 ते 13 जून दरम्यानचे संभाषण
यापूर्वी व्हायरल झालेले 8 जून रोजीचे महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांचे मेसेज काय होते?
सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर सोडले होते. त्यानंतर तिने महेश भट्ट यांना मेसेज केला होता. त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट काही दिवसांपूर्वीच आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.