आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Rhea Chakraborty Interview Update | Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput Death Case; Rhea Said 'Sorry Babu’ Infront Of Sushant Dead Body

सुशांत प्रकरणात रियाचे स्पष्टीकरण:रिया चक्रवर्ती म्हणाली - होय मी सुशांतच्या पार्थिवासमोर 'सॉरी बाबू' म्हणाले होते, शवागारात फक्त 3 ते 4 सेकंद थांबले होते

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रियाच्या म्हणण्यानुसार 14 जून रोजी तिच्या एका मित्राने तिला सुशांतच्या मृत्यूची बातमी दिली होती.
 • रियाने सांगितले की, शवागारात सुशांतला अखेरचे बघताना त्याच्या पायाला तिने स्पर्श केला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी तिने सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळाल्यापासून ते त्याला शवागारात जाऊन बघण्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

न्यूज चॅनल इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतच्या मृत्यूची बातमी तिला कशी समजली याविषयी सांगितले. ती म्हणाली, '14 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मी माझ्या भावाबरोबर माझ्या खोलीत होते. तेव्हा मला माझ्या एक मित्राचा फोन आला. आणि सुशांतच्या मृत्यूची अफवा पसरली असून ती थांबव, असे तो म्हणाला. तुम्ही कुठे आहात, सुशांतला समोर येऊन बोलायला सांग, असे तो म्हणाला. तेव्हा त्याला माहित नव्हते की मी सुशांतचे घर सोडले असून माझ्या घरात आहे. अशी अफवा कशी येईल असा प्रश्न मला पडला. मग 10-15 मिनिटांतच कुठूनतरी स्पष्टीकरण आले.' सुशांतने आत्महत्या केल्याचे समजताच मी कोलमडून गेले होते, असे रियाने यावेळी सांगितले.

 • मी तिथे यावे अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा नव्हती

सुशांतच्या मृत्यूची बातमी समजताच सुशांतच्या घरी गेली होती का? असा प्रश्न रियाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, "नाही, मी त्याच्या घरी गेले नव्हते मी पुरती कोलमडले होते. मला खूप मोठा धक्का बसला होता. हे कसे घडेल हे मला समजू शकले नाही. मला सांगण्यात आले की त्याच्या अंत्यसंस्कारासाठी येणा-या लोकांच्या यादीत माझे नाव नाही. इंडस्ट्रीतील बर्‍याच जणांची नावे त्यात होती. मला इंडस्ट्रीतील काही लोकांकडूनच समजले की, यादीत माझे नाव नाही आणि मी तिथे अजिबात जाऊ शकत नाही. सुशांतच्या कुटुंबीयांना मी तिथे नकोय.'

कूपर हॉस्पिटलच्या बाहेर रिया चक्रवर्ती.
कूपर हॉस्पिटलच्या बाहेर रिया चक्रवर्ती.
 • अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या लोकांच्या यादीत माझे नाव नव्हते

रिया म्हणाली, 'मी सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्यास तयार होते, माझे इंडस्ट्रीतील एक-दोन मित्र तेथे जाणार होते. त्यापैकी एकाने मला फोन करुन आणि एकाने माझ्या घरी येऊन मला समजावून सांगितले की, मी तिथे जाऊ शकत नाही. कारण त्या लोकांना (सुशांतच्या कुटुंबाला) तू तिथे नकोय. या यादीमध्ये तुझे नावदेखील नाही. तू तिथे गेली तर तुला तेथून अपमानिक करुन बाहेर काढले जाईल. तुझी मानसिक स्थितीदेखील आता चांगली नाही. त्यामुळे तू तिथे येऊ नको, असे माझ्या मित्राने मला सांगितले होते. मी सकाळपासूनच सुशांतला कधी बघू शकेल याची वाट बघत होते. त्यामुळे माझ्या दोन मित्रांनी मला म्हटले की, एकदा सुशांतची बॉडी बघणे तुझ्यासारखी आवश्यक आहे. अन्यथा या गोष्टीवर तुझा कधीही विश्वास बसणार नाही आणि ही गोष्ट स्वीकारणे फार कठीण आहे.'

 • याच कारणास्तव सुशांतला म्हटले होते 'सॉरी बाबू'

शवागारात गेल्यानंतर रियाने सुशांतला सॉरी बाबू म्हटले होते. याचे कारण तिला विचारले असता ती म्हणाली, "होय, मी सॉरी बाबू म्हणाले होते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती अजून काय म्हणू शकेल? मी माफी मागितली कारण त्याने आपले जीवन संपवले होते. आणि आजही मला वाईट वाटतंय की, त्याच्या मृत्यू एक विनोद झाला आहे. मला खेद वाटतोय की, तुझ्या शेवटच्या चांगल्या आठवणी, तुझी चांगली कामे, तुझी बुद्धिमत्ता आणि चॅरिटी कुणालाही आठवत नाहीये. मला खेद वाटतोय की तुझ्या मृत्यूची चेष्टा केली जातेय. माझी त्याच्याकडे माफी मागणे हेसुद्धा चुकीच्या अर्थाने घेतले जात असेल तर यावर काय बोलू शकते?', असे रियाने स्पष्ट केले.

आपल्या काही मित्रांसोबत रिया कूपर हॉस्पिटलमध्ये गेली होती.
आपल्या काही मित्रांसोबत रिया कूपर हॉस्पिटलमध्ये गेली होती.
 • शवागारात केवळ 3-4 सेकंद थांबले होते

शवागाराच्या आत थांबल्याविषयी रिया म्हणाली, 'कदाचित तीन ते चार सेकंद मी तिथे थांबले असेल. मला बाहेर वाट बघायला सांगण्यात आले होते. माझ्या एका मित्राने कुणाकडे तरी विनंती केली की, शेवटचे सुशांतचे पार्थिव ती बघू इच्छिते. त्यावर सांगण्यात आले की, एकदा पोस्टमॉर्टम संपल्यावर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जाईल, तेव्हा तुम्ही ते बघू शकता. त्यामुळे जेव्हा पार्थिव व्हॅनमध्ये नेले जात होते, तेव्हा मी सुशांतला तीन ते चार सेकंद पाहिले आणि तेव्हा सॉरी म्हटले होते. मग मी त्याच्या पायाला स्पर्श केला. आणि मला वाटते की एक भारतीय म्हणून कुणी एखाद्याच्या पायाला का स्पर्श करतो हे समजू शकते.'

सुशांतसोबतचा हा फोटो रियाने 14 जुलै रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
सुशांतसोबतचा हा फोटो रियाने 14 जुलै रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.