आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिया चक्रवर्ती पुन्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव:वॉचमनचा व्हिडिओ शेअर करुन रियाचा पत्रकारांवर मारहाण केल्याचा आरोप; दुसरा व्हिडिओ शेअर करुन म्हणाली - ‘माझ्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका’

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने वॉचमनचा व्हिडिओ ट्विरटवरुन डिलीट केला आहे.
  • इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन तिने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.

जवळजवळ एक महिन्याहून अधिक काळ सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती गुरुवारी पुन्हा अ‍ॅक्टिव झाली आहे. रियाने नुकताच आपल्या बिल्डिंगच्या वॉचमनचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करुन काही पत्रकारांनी त्याला मारहाण केली असल्याचा आरोप केला. मात्र थोड्या वेळाने तिने तो व्हिडिओ डिलीट केला.

व्हिडिओ शेअर करुन रियाने लिहिले, 'हा राम आहे. तो माझ्या बिल्डिंगचा वॉचमन आहे. काही पत्रकारांनी माझ्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि माझ्या वडिलांनी आणि सुरक्षा कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले. हा गुन्हा नाही काय? येथे काही कायदा आहे का? प्रशासनाने याची दखल घ्यावी. #justiceforram', अशा आशयाचे ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये हॅशटॅग वापर रामला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ती म्हणाली आहे.

परंतु या ट्विटमुळे रियाला ट्रोल केले जाऊ लागले. परिणामी काही मिनिटांत तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन डिलिट केला आहे.

  • रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय होते?

व्हिडिओमध्ये रियाच्या बिल्डिंग वॉचमन म्हणतोय, 'माझे नाव राम आहे, मी येथे 10 वर्षांपासून आहे. मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पण आज मीडियाचे लोक आले, मीडियाचे लोक आम्हाला खूप त्रास देत आहे. ते आम्हाला मारहाण करतात. मला दुखापतसुद्धा झाली आहे. माझ्या घरी लहान मुलं आहेत. आम्हाला घरीसुद्धा जायला मिळत नाहीये. इथे खूप गोंधळ सुरु आहे. आम्हाला सर्वजण धमकावत आहेत, वर जाऊ द्या म्हणून वारंवार म्हणत आहेत, आम्हाला मारहाण करत आहे', असे वॉचमन या व्हिडिओ म्हणाला आहे. पण आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर नाहीये.

रियाच्या ट्विटचा स्क्रीनशॉट
रियाच्या ट्विटचा स्क्रीनशॉट
  • गुरुवारीच इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली रिया

आज सकाळी रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन तिला आण तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. सोबतच मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रियाच्या इमारतीखाली एक हवालदार तैनात केला आहे.

  • रिया म्हणते - आम्ही कसं जगायचं

रियाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत तिचे वडील इमारतीत शिरत असताना पत्रकार व छायाचित्रकार त्यांच्याभोवती घोळका करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करुन ती लिहिते, ‘हा माझ्या इमारतीच्या कम्पाऊंडमधला व्हिडिओ आहे. त्यात दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजित चक्रवर्ती (निवृत्त लष्कर अधिकारी) आहेत. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. आम्ही स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. परंतु कोणीच आमची मदत करत नाहीये. आम्ही कसं जगायचं? मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी’, अशी पोस्ट रियाने लिहिली आहे.