आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांतचे मेहुणे सीबीआय ऑफिसमध्ये जाऊन करणार पुन्हा तपासाची मागणी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये लावणार हजेरी

22 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • असे मानले जात आहे की, रिया थोड्याच वेळात आपले घरातून सांताक्रूज पोलिस स्टेशनसाठी निघणार आहे
 • सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयचा तपास अद्यापही सुरू आहे आणि सर्व बाजूंनी सावधागिरीने तपास सुरू आहे

एकीकडे सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणात त्यांचे मेहुणे आयपीएस ओपी सिंह दिल्लीतील सीबीआय कार्यालयात जाणार आहेत. ते पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला विनंती करतील. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुंबईच्या भायखळा तुरूंगातून सुटल्यानंतर आपल्या घरी पोहोचली आहे.

ड्रग संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर 28 दिवसांनी रिया आपल्या घरी पोहोचली. तिला घेऊन जाण्यासाठी तिचे आई-वडील तुरुंगातली पोहोचले होते. जामीन मिळाल्यानंतर तिला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भायखळा कारागृहातून सोडण्यात आले, परंतु मीडिया घराबाहेर जमलेले पाहून रात्री एक वाजता कुटुंबासमवेत घरी पोहोचली. मात्र, रियाचा त्रास अद्याप संपलेला नाही, तिला उपस्थितीसाठी 10 दिवस सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल. असे मानले जात आहे की, थोड्याच वेळात रिया आपले घरातून सांताक्रूज पोलिस स्टेशनसाठी रवाना होणार आहे.

बॉम्पे हायकोर्टने या अटींवर दिला जामीन

 • तुरुंगातील सुटका झाल्यानंतर 10 दिवस दररोज जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता हजेरी लावावी लागेल.
 • जामीनासाठी एक लाख रुपये भरावे लागतील.
 • पासपोर्ट जमा करावा लागेल.
 • कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही.
 • मुंबईतून बाहेर जाण्यासाठी तपासातील पाच अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल.
 • महीन्यातील पहिल्या सोमवारी रियाला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी द्यावी लागेल.
 • या प्रकरणासंबंधीत कोणत्याही साक्षीदाराला भेटण्याची परवानगी नाही.
 • न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान रियाला हजर राहावे लागेल.

एनसीबीचा युक्तिवाद - रिया ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय सदस्य

एनसीबीने रिया आणि शोविकच्या जामीनाला विरोध दर्शवला होता. रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असे तपास यंत्रणेने कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोबतच त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिनेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शोविक यांना ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते.

रियाच्या वकिलांचा युक्तिवाद - सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत असे

रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. रियासह आणखी दोन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.