आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण:NCBच्या ऑफिसमध्ये रिया आणि शोविक चक्रवर्तीने लावली हजेरी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी हजेरी लावण्याचा कोर्टाने दिला होता आदेश

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना अटक आणि त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका झाली होती. कोर्टाकडून जामीन देताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आज रिया आणि शोविक सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये जवळजवळ अर्धा तास घालवल्यानंतर हे दोघे घरी परतले. सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस, बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबीने केला, मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्यान एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला होता. यात दीपिका पदुकोणसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या नावांचा उलगडा झाला आणि याप्रकरणी त्यांची चौकशी झाली होती.

रियाला एक तर शोविकला तीन महिन्यांनी मिळाला होता जामीन
रिया आणि शोविक यांना ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. रिया जवळजवळ महिनाभर तुरुंगात होती. तर शोविकने तीन महिने तुरुंगात घालवले होते. कोर्टाने शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज 2 डिसेंबरला मंजूर केला होता. तर रिया चक्रवर्तीला तब्बल 28 दिवसानंतर जामीन मंजूर मिळाला आला होता. मात्र, जामीन अर्ज मंजूर करताना कोर्टाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती.

रिया नवीन घराच्या शोधत
मागील वर्षी म्हणजेच सुमारे तीन दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित आणि आई संध्या चक्रवर्ती मुंबईत नवीन घराच्या शोधात फिरताना दिसले होते. तर रविवारी रिया आणि तिचा भाऊदेखील घराच्या शोधात होते. तुरुंगात बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे बहीणभाऊ सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...