आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चित्रपट निर्माते आणि करणी सेनेचे नेते सुरजीत सिंग राठोड यांनी नवीन दावा केला आहे. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, "सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी होती. त्याच रात्री भांडणानंतर रिया घरातून बाहेर पडली होती.
सुरजीत म्हणाले - आधीही खुलासा केला होता, मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही
रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सुशांतच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनी हा खुलासा का करत आहात? ही गोष्ट तपास अधिका-यांना का सांगितली नाही? असे प्रश्न सुरजीत यांना विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, सीबीआयने चौकशीसाठी त्यांच्याकडे संपर्क साधला नाही. मी यापूर्वीही हा खुलासा केला होता, पण माध्यमांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
रियाचे शवागृहातील विधान उघड केले होते
सुरजीत यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये रियाने कूपर रुग्णालयातील शवागृहाला भेट दिल्याचा खुलासा केला होता. याविषयी त्यांनी खुलासा करताना सांगितले होते की, "रिया तिचा मित्र सूरज सिंगसोबत तिथे आली होती. रियाला शेवटच्या वेळी सुशांतचा चेहरा दाखवा अशी सूरजने मला विनंती केली होती. मी पोलिसांशी बोललो आणि रियाला घेऊन शवागृहाच्या आत गेलो. मी सुशांतच्या चेह-यावरुन चादर काढली, त्यावेळी रियाने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि 'सॉरी बाबू' म्हटले. आम्ही आत 5 ते 7 मिनिटे थांबलो होतो."
भाजप नेत्याचाही खुलासा - 13 जून रोजी रिया सुशांतच्या घरीच होती
भाजप नेते व वकील विवेकानंद गुप्ता यांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाला देत दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 जून रोजी रियाने त्याची (सुशांत) भेट घेतली होती. त्या रात्री रिया सुशांतला रात्री 2 ते 3 च्या सुमारास भेटली होती. नंतर सुशांत तिला घरी सोडायला गेला होता. 8 जून रोजी आपण सुशांतचे घर सोडले, हे रियाचे विधान साफ खोटे आहे. याबद्दल सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीजवळ ठोस माहिती आहे. कारण सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्या घरी आलेल्या लोकांबद्दलची त्याला संपूर्ण माहिती आहे.
सुशांत प्रकरणात खुनाचा कलम जोडण्याची तयारी
सीबीआय आता या प्रकरणात आयपीसी कलम 302 (खून) जोडण्याचा विचार करत आहे. एम्सच्या पथकाने आपला तपास अहवाल सादर केला आहे, त्यानंतर सीबीआय या प्रकरणातील दुसर्या टप्प्यातील चौकशी सुरू करणार आहे. सुशांतचे रुममेट सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होणार असल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.