आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या पहिल्या स्मृतीदिनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना तिने सुशांतसोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे. रियाने या भावुक पोस्टमधून सुशांतबद्दल तिला वाटणारे प्रेम व्यक्त केले आहे.
रियाने लिहिले, 'मी रोज त्या दिवसाची वाट बघते आहे, ज्या दिवशी तू येथील आणि मला तुझ्यासोबत घेऊन जाशील. मी तुला प्रत्येक ठिकाणी तुला शोधते आहे. खरे तर मला माहिती आहे की तू माझ्यासोबतच आहेस. तरी देखील मी तुला सतत शोधत असते. तू मिळाला नाहीस की उदास होते. मग मी विचार करते तू यावर म्हणशील,'मी तर तुझ्याजवळच आहे बेबू...' पण मी पुन्हा दुस-या दिवशी पुन्हा तुला शोधत रहाते.'
रियाने पुढे लिहिले, 'जेव्हा जेव्हा मला वाटते ती तू इथे नाहीस, तेव्हा माझ्या मनामध्ये भावनांचा सागर दाटून येतो. हे लिहितानाही माझ्या मनाला खूप यातना होतात, मला आता तर कोणत्या गोष्टींमुळे फक्त दुःखाचीच जाणीव होते. तुझ्याशिवाय आयु्ष्य नाहीच आणि माझ्या आयुष्याचे सारे अर्थ तू जाताना तुझ्यासोबत घेऊन गेलास. माझ्या आयुष्यात जे रितेपण आले आहे, ते कशानेही भरले जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी अजूनही उभी आहे. प्लीज तू परत ये. मला तुझी खूप आठवण येते. माझा सर्वोत्तम मित्र, माझा प्रियकर, माझे प्रेम... बेबू आणि पुटपुट...' अशा शब्दांत रियाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
14 जून 2020 रोजी झाला होता सुशांतचा मृत्यू
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांनी प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, सुमारे दीड महिन्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केला होता. सिंह यांनी रियाविरोधात सुशांतच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा तपास नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयला सहकार्य करणा-या एम्सने या प्रकरणात हत्येची शक्यता नाकारून एजन्सीला अहवाल सादर केला आहे. मात्र, सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.