आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणातील रिया कनेक्शनचा संपूर्ण घटनाक्रम:15 जून रोजी रुग्णालयात पार्थिव बघून म्हणाली होती सॉरी बाबू, ऑगस्टमध्ये ड्रग्ज अँगल आले समोर आणि आता सप्टेंबरमध्ये झाली अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतरही रिया त्याच्या घरी गेली नव्हती. 15 जून रोजी शवागारात जाऊन सॉरी बाबू म्हटले होते.
 • 26 ऑगस्ट रोजी रियाविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुन्हा दाखल केला, आता तीन दिवसांच्या चौकशीनंतर 8 सप्टेंबर रोजी तिला अटक करण्यात आली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 86 दिवसानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. सुशांत 14 जून रोजी मुंबईत मृतावस्थेत आढळला होता. पण पाटण्यातील पोलिसांची एसआयटी मुंबईत चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर 28 जुलै रोजी संशयाची सुई रियाकडे फिरली. त्यानंतर तीन केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी रियाविरूद्ध तपास सुरू केला. आणि प्रथम यश एनसीबीला मिळाले, जे शेवटी या तपासात सामील झाले होते. रियाचे हे 84 दिवस कसे होते, त्यावर एक नजर टाकूया...

जूनमध्ये काय-काय घडले?

 • 14 जून: दुपारी सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची बातमी आली. यापूर्वी सहा दिवस अगोदर म्हणजे 8 जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले होते आणि ती माउंट ब्लॅकमध्ये तिच्या घरी गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही रिया त्याच्या घरी गेली नाही किंवा त्याच्या स्टाफला फोनदेखील केला नाही.
 • 15 जून: रिया तिचा भाऊ शोविक आणि काही मित्रांसह कूपर रुग्णालयाच्या मोर्चरीत गेली. तिथे पोस्टमॉर्टमनंतर सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. तिथे सुशांतच्या छातीवर हात ठेवत रिया म्हणाली होती, "सॉरी बाबू."
 • 18 जून: मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती हिला वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. रियाने कबूल केले की, सुशांतच्या कुटूंबाशी तिचे संबंध चांगले नाहीत. याच कारणामुळे तिला सुशांतच्या अंत्यविधीपासून दूर ठेवले गेले होते.

जुलैमध्ये काय-काय घडले?

 • 16 जुलै: सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी व्हावी, असे विनंती रिया चक्रवर्तीने गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. यापूर्वीच बातमी आली होती, की रिया चक्रवर्ती सुशांतचा पैसा खर्च करायची याचा पुरावा मुंबई पोलिसांना सापडला होता.
 • 25 जुलै: सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच सुशांतच्य खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.
 • 28 जुलै: पाटणा पोलिसांची एसआयटी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली. पण रिया आणि तिचे कुटुंब घरी नाहीत असे समोर येते. रात्रीतून अचानक बातमी आली की, रियाने वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. पाटण्यात दाखल केलेली एफआयआर चुकीची असल्याचे सांगून त्यांनी ती मुंबईत हस्तांतरित करण्याचे मागणी केले होती.
 • 30 जुलै: सुशांतच्या कुटूंबाच्या वतीने रियाच्या याचिकेविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करणयात आली.
 • 31 जुलै: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला.
 • 31 जुलै: पाटण्यामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्ती हिने पहिल्यांदाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये ती म्हणाली होती की, देव आणि न्यायपालिकेवर तिचा विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल, असे ती व्हिडिओत म्हणाली होती.

ऑगस्टमध्ये काय-काय घडले?

 • 4 ऑगस्ट: बिहार सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे करण्याची शिफारस केली.
 • 5 ऑगस्ट: सीबीआय चौकशीच्या बिहार सरकारच्या शिफारशीला केंद्र सरकारने मान्यता दिली. रिया चक्रवर्तीच्या याचिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांकडून जाब विचारला.
 • 6 ऑगस्ट: सीबीआयने रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, श्रुती मोदी आणि सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
 • 7 ऑगस्ट: ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सीए रितेश शाह आणि सुशांतचा माजी मॅनेजर श्रुती मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली. रियाने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले. सुशांतच्या पैशांची हेराफेरी केली नसल्याचे ती म्हणाली होती. रियाची 8 तास चौकशी केली गेली.
 • 9 ऑगस्ट: रिया चक्रवर्तीच्या भावाची ईडीने चौकशी केली.
 • 10 ऑगस्ट: रिया चक्रवर्तीने मीडिया ट्रायलविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रिया पुन्हा ईडीसमोर हजर झाली. यावेळी तिची 10 तास चौकशी करण्यात आली.
 • 11 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवत सर्व पक्षांना आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले.
 • 13 ऑगस्ट: सीबीआयने आपले म्हणणे दाखल केले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना आणि ईडीला परवानगी द्यावी अशी विनंती केली.
 • 18 ऑगस्ट: रिया चक्रवर्तीने आपल्या वकिलांंमार्फत निवेदन प्रसिद्ध केले आणि हे सर्व आरोप फेटाळून लावले. सुशांतची बहीण प्रियंकावर तिने विनयभंगाचा आरोपही केला. 19 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये पाटण्यातील एफआयआर योग्य असल्याचे सांगत तपास सीबीआयकडे सोपवला. तसेच या प्रकरणात अन्य कोणतीही एफआयआर नोंदविल्यास त्याची सीबीआयच चौकशी करेल, असेही सांगितले.
 • 20 ऑगस्ट: सीबीआयच्या एसआयटी टीमने चौकशीसाठी मुंबई गाठली.
 • 26 ऑगस्ट: 26 ऑगस्ट रोजी नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) रिया चक्रवर्ती आणि इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल केला. वास्तविक, ईडीने रिया चक्रवर्तीचे दोन फोन क्लोन केले होते आणि त्यातून हटवलेला डेटा रिट्रीव्ह केला. क्लोनिंगनंतर रियाचे चॅट उघडकीस आले आणि त्यातूनच ड्रग्ज कनेक्शन समोर आले.
 • 27 ऑगस्ट: रियाने सुशांतच्या मृत्यूनंतर प्रथमच मीडियाला मुलाखत दिली. एका वृत्त वाहिनीशी बोलताना तिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे तिने सांगितले होते. स्वतः कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचे सांगत आपण सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीपासून तो ड्रग्ज घ्यायचा असे ती म्हणाली.
 • 28 ऑगस्टः रिया चक्रवर्तीला सीबीआयने पहिल्यांदाच चौकशीसाठी बोलावले.
 • 29 ऑगस्ट: दुसर्‍या दिवशी सीबीआयने रिया चक्रवर्तीची चौकशी केली आणि मुंबई पोलिसांना सुरक्षा देण्यास सांगितले.
 • 30 ऑगस्ट: रिया चक्रवर्तीला सीबीआयने सलग तिसर्‍या दिवशी चौकशीसाठी बोलावले.

सप्टेंबरमध्ये काय-काय घडले ?

 • 4 सप्टेंबर: रिया चक्रवर्तीच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांनी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आणि सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.
 • 5 सप्टेंबर: शोविक आणि सॅम्युअल यांना मुंबईच्या फोर्ट कोर्टात हजर करण्यात आले, तेथून 9 सप्टेंबरपर्यंत त्यांना एनसीबीच्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. तेथेच त्यांनी रियाने ड्रग्ज खरेदी, विक्री आणि घेतल्याची कबुली दिली.
 • 6 सप्टेंबर: एनसीबीच्या टीमने रिया चक्रवर्तीच्या घरी जाऊन समन्स बजावले. त्याच दिवशी तिची पहिल्यांदा चौकशी केली गेली.
 • 7 सप्टेंबर: रियाची एनसीबीने आणखी एक दिवस चौकशी केली आणि तिने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली. मात्र ती जे काही करायची ते फक्त सुशांतसाठी असायचे असे ती म्हणाली. इतकेच नाही तर सुशांतला चुकीची औषधे दिल्याबद्दल रियाने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये सुशांतची बहीण प्रियांकाविरूद्ध एफआयआर दाखल केला.
 • 8 सप्टेंबर: एनसीबीने रियाची सलग तिस-या दिवशी चौकशी केली. या चौकशीदरम्यान तिने ड्रग्जचे सेवन केल्याचे कबुल केले. यानंतर तिला अटक करण्यात आली.