आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाली क्लीन चिट, NDPS कोर्टाने सांगितले - ड्रग्ज तस्करीचा आरोप सिद्ध होत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने म्हटले की, कलम 27A लागू होत नाही

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता त्याला क्लीन चिट दिली आहे. वृत्तानुसार, कोर्टाने शोविकवरील अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वित्त पुरवल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. तुरुंगात 28 दिवस घालवल्यानंतर रियाला जामीन मंजूर झाला होता, तर शोविकची जामीन याचिका अनेक वेळा फेटाळण्यात आली होती.

कोर्टाने म्हटले की, कलम 27A लागू होत नाही
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासामध्ये सीबीआय, ईडी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा सहभाग आहे. तथापि, या प्रकरणात, सीबीआयचा तपास कुठवर आला आहे, हे जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे आरोप फेटाळून लावले होते. कोर्टाने म्हटले आहे की, ड्रग्ज बाळगणे याचा अर्थ आरोपीचा बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभाग असावा किंवा त्याने त्यासाठी वित्तपुरवठा केला असावा असा होत नाही. त्या आधारे विशेष एनडीपीएस कोर्टाने शोविकला जामीन मंजूर केला होता. कोर्टाने म्हटले आहे की, एनडीपीएस कायद्याची कलम 27 ए आरोपींना लागू होत नाही.

शोविक 3 महिने तुरूंगात होता
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर शोविकला 4 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज पेडलर अब्देल बासित परिहारच्या जबाबानंतर शोविकला अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये शोविकने सांगितले होते की, तो जैद विलात्रा आणि कैझान इब्राहिमकडून ड्रग्ज घेत असे. 3 महिन्यांनंतर स्थानिक एनडीपीएस कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. यापूर्वी, त्याचा जामीन अर्ज दोनदा उच्च न्यायालयाने आणि दोनदा सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser