आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाच्या अटकेवर प्रतिक्रिया:रियाला अटक झाल्यानंतर तिचे वकील म्हणाले - 3 तपास यंत्रणांनी न्यायाची थट्टा चालवली आहे, कारण रिया अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीवर प्रेम करायची

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक रिअॅक्शन येत आहेत. याच काळात रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या क्लाइंटचा बचाव करत स्टेटमेंट जारी केले आहे. सतीश यांनी सुशांतला ड्रग अॅडिक्ट, मेंटल हेल्थचा सामना करत असलेला व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच रियाला सुशांतवर प्रेम करत असल्याचीही ही शिक्षा मिळाली असल्याचेही तिचे वकील म्हणाले.

न्यायाची थट्टा चालवली - सतीश
रियाचे वकील सतीश पुढे म्हणाले की, ' तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत. याचे एकच कारण आहे ते म्हणजे ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीवर प्रेम करत होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचे सेवन केल्यानंतर आत्महत्या केली. '