आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI च्या हातात सुशांत प्रकरणाचा तपास:सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले - तपास कुणीही केला तरी सत्य तेच राहिल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता रियाला सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला सर्व सहकार्य करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निकालानंतर सुशांतच्या कुटुंबीयांसह, चाहते आणि बॉलिवूड कलाकारांनी समाधान व्यक्त केले असून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना तपास कुणीही केला तरी सत्य तेच राहिल, असे रियाचे म्हणणे असल्याचे सांगितले आहे.

  • रियाने तपासात आतापर्यंत सर्वांना सहकार्य केले आहे - सतीश मानशिंदे

सतीश मानशिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सीबीआय चौकशीची मागणी स्वतः केली होती. सोबतच दोन्ही राज्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे कार्टाने पाहिले आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविणे योग्य ठरेल, असा निर्णय कोर्टाने घेतला आहे.

भारतीय घटनेच्या कलम 142 अन्वये कोर्टाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. आता रिया सीबीआय चौकशीला देखील सामोरे जायला तयार आहे. यापूर्वी रियाने मुंबई पोलिस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ला चौकशीत संपूर्ण सहकार्य केले आहे. कारण तपास कुणीही केला तरी सत्य तेच राहणार आहे, असे रिया म्हणाली असल्याचे सतीश मानशिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीची प्रतीक्षा करत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...