आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:रिया चक्रवर्तीच्या शेजा-याचा दावा - मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी सुशांत रियाला घरी सोडायला आला होता, तो स्वतः गाडी चालवत होता

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जून रोजी आपण सुशांतचे घर सोडले, हे रियाचे विधान साफ खोटे आहे, असे म्हटले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दर दिवशी नवीन दावे केले जात आहेत. आता रिया चक्रवर्तीच्या शेजा-याने केलेल्या दाव्यानुसार, ती अशा एका प्रत्यक्षदर्शीला ओखळते ज्याने रिया आणि सुशांतला 13 जूनच्या रात्री एकत्र पाहिले होते.

रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, रियाच्या शेजा-याने सांगितल्यानुसार, त्या प्रत्यक्षदर्शीने सुशांतला रियाला घरी सोडताना पाहिले होते. यावेळी स्वतः सुशांत कार चालवत होता आणि त्यांच्यासोबत ड्रायव्हर नव्हता. ती संध्याकाळची 6-6:30 ची वेळ होती. जेव्हा सुशांतच्या मृत्यूबद्दल शेजा-याला समजले तेव्हा त्या प्रत्यक्षदर्शीने त्याला सांगितले की, मी तर त्याला 13 जूनच्या संध्याकाळीच रियाला घरी ड्रॉप करताना पाहिले होते.

भाजप नेत्याचाही खुलासा - 13 जून रोजी रिया सुशांतच्या घरीच होती
भाजप नेते व वकील विवेकानंद गुप्ता यांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाला देत दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 जून रोजी रियाने त्याची (सुशांत) भेट घेतली होती. त्या रात्री रिया सुशांतला रात्री 2 ते 3 च्या सुमारास भेटली होती. नंतर सुशांत तिला घरी सोडायला गेला होता. 8 जून रोजी आपण सुशांतचे घर सोडले, हे रियाचे विधान साफ खोटे आहे.

सुरजीत सिंहनेदेखील हा दावा केला होता
चित्रपट निर्माते आणि करणी सेनेचे नेते सुरजीत सिंग राठोड यांनी दावा केला होता की, रिया 13 जूनच्या रात्री सुशांतला भेटली होती. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, "सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी होती. त्याच रात्री भांडणानंतर रिया घरातून बाहेर पडली होती.' रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सुशांतच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनी हा खुलासा का करत आहात? ही गोष्ट तपास अधिका-यांना का सांगितली नाही? असे प्रश्न सुरजीत यांना विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, सीबीआयने चौकशीसाठी त्यांच्याकडे संपर्क साधला नाही. मी यापूर्वीही हा खुलासा केला होता, पण माध्यमांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.

13 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतला भेटली नव्हती - सिद्धार्थ पिठानी
याविषयी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीसोबत बोलताना सिद्धार्थ पिठानीने हा दावा फेटाळून लावला होता. रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी सुशांतला भेटली होती, यात तथ्य नसल्याचे त्याने म्हटले होते. 8 जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले होते, असे सिद्धार्थने सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले होते. यासोबतच रिया घर सोडून जाताना सोबत हार्डड्राइव्ह, कॅमेरा घेऊन गेली होती, ज्याचे पासवर्ड रियाला माहित होते, असेही त्याने सांगितले होते.

सिद्धार्थ 14 जूनपर्यंत सुशांतच्या घरीच होता. एवढेच नाही तर सिद्धार्थनेच सुशांतला खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सर्वप्रथम पाहिले होते.

बातम्या आणखी आहेत...