आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हिरावले काका:रिया चक्रवर्तीच्या काकांचे कोरोनामुळे निधन, रिया म्हणाली- 'घरीच राहा कारण कोविड चांगले किंवा वाईट बघत नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने लोकांना घरी राहण्याचे केले आवाहन

कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेने भारतात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतोय. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने अनेक कलाकारांचे निधन झाले, तर काहींनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील कोरोनामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमावले आहे. रियाचे काका निवृत्त कर्नल एस. सुरेश कुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत रियाने लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

रियाने सोशल मीडियावर तिच्या दिवंगत काकांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'कर्नल एस. सुरेश कुमार, 10 नोव्हेंबर 1968 - 1 मे 2021... एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन, एक सम्माननीय अधिकारी, प्रेमळ पिता आणि एक उत्तम व्यक्ती…कोरोनाने तुम्हाला आमच्यापासून दूर केले…परंतु तुमच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील…सुरेश अंकल, तुम्ही एक रिअल लाइफ हिरो आहात… तुम्हाला सलाम करते सर!'

लोकांना घरी राहण्याचे केले आवाहन

कोविडमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे बघता रियाने तिच्या चाहत्यांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. रियाने लिहिले, 'कृपया घरी राहा आणि सुरक्षित राहा, अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. कोविड चांगले, वाईट बघत नाही. घरी रहा, सुरक्षित रहा.'

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कामाच्या शोधात आहे रिया
रिया ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती. त्याच्या निधनानंतर रिया वादात आहेत. वादाची पार्श्वभूमी असल्याने तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणे अशक्य वाटत आहे, त्यामुळे आता ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधत आहे. याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी ती हैदराबादला गेली होती. रिया रुमी जाफरींच्या चेहरे या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...