आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल:रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल: सुशांतचे घर सोडताच रियाने केला होता भट्ट यांना मेसेज; आता मागे वळून पाहू नकोस, भट्ट यांनी दिले होते उत्तर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून यासाठी अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. याच दरम्यान, दिग्दर्शक महेश भट्ट आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे व्हॉट्सअप संभाषण व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या या चॅटमध्ये सुशांतच्या मृत्यूच्या अवघ्या 6 दिवसांपूर्वी अर्थात 8 जूनच्या रात्रीचे संभाषण आहे. ही चर्चा त्या रात्री 7:43 से 8:08 वाजेपर्यंत झाली. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून निघाली होती. यात महेश भट्ट यांनी रियाला आता मागे वळून पाहू नकोस असा सल्ला दिला होता.

इंडिया टुडेने आपल्या एका लेखात या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये रिया महेश भट्टसमोर स्वतःला त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या जलेबी चित्रपटातील आयशा असे उद्देशून बोलताना दिसून आले. यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पुढे वाचा...

रिया चक्रवर्ती : जड अंतःकरणाने आयशा पुढे निघून गेली आहे सर... आपला शेवटचा कॉल हा एक वेक-अप कॉल होता. तुम्ही माझे एंजल आहात. तेव्हा देखील होता आणि अजुनही आहात.

महेश भट्ट: आता मागे वळून पाहू नकोस. हे शक्य बनव, जे आवश्यक आहे. तुझ्या वडिलांना प्रेम, त्यांना आनंद होईल.

रिया चक्रवर्ती: त्या दिवशी तुम्ही जे माझ्या वडिलांबद्दल बोललात त्यातून काहीसे धाडस मिळाले. त्याने मला स्ट्राँग होण्याची प्रेरणा मिळाली. नेहमीच खास होण्यासाठी त्यांनी तुम्हाला प्रेम आणि धन्यवाद म्हटले आहे.

महेश भट्ट: तू माझे लेकरू आहेस. मी हलके फील करतो.

रिया चक्रवर्ती : आह...शब्द नाहीत सर, माझे अंतःहरण दाटून आले आहे. पण, तुमच्यासाठी जी फीलिंग होत आहे ती सर्वात चांगली आहे.

महेश भट्ट: धाडसी होण्यासाठी धन्यवाद.

रिया चक्रवर्ती : नशीबाला धन्यवाद की त्याने माझी भेट तुमच्याशी करून दिली. तुम्ही खरे आहात. आपल्या वाटा याच दिवसासाठी जुळल्या होत्या. फक्त एका चित्रपटासाठी नाही तर काहीतरी खूप वेगळे आहे. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द माझ्या डोक्यात फिरतो. तुमच्या अमर्याद प्रेमामुळे खूप फरक पडतो.

महेश भट्ट: हो, हो, हो. मी कामी आलो नाही तर माझ्या असण्यालाच काय अर्थ.

रिया चक्रवर्ती : तुम्ही मला पुन्हा स्वतंत्र केलात. देवाप्रमाणेच तेही आयुष्यात दुसऱ्यांदा...

महेश भट्ट : रेस्ट.

रिया चक्रवर्ती: आह शांती.

महेश भट्ट : हॅप्पी बर्थडे. (या दिवसाला महेश भट्ट रियाचा पुनरजन्म मानत असावेत.)

रिया चक्रवर्ती : हाहा-हाहा... मी स्माइल करतेय. आय लव्ह यू माय बेस्ट मॅन. तुम्हाला माझ्यावर नक्कीच गर्व होईल.

महेश भट्ट : मला आधीच आहे. खरंच. तू जे केलंस, त्यासाठी गट्स हवेत. आता मागे वळू नकोस.
महेश भट्ट यांनी सुशांतसोबत ब्रेकअप करण्याचा दिला होता सल्ला?

मुंबई पोलिसांनी रियाची चौकशी केली तेव्हा रियाने म्हटले होते की सुशांतने तिला घराबाहेर होण्यास सांगितले होते. कारण तिच्या वडिलांना हे नाते आवडले नाही. रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांनीच रियाला ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता. रियाने सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल इतरांना देखील सांगितल्याचे बोलले जात आहे.

8 जून बद्दल रिया आणि सुशांत कुटुंबियांची कहाणी वेग-वेगळी

सुशांतची बहीण मीतूने दावा केला होता की रियाने तिला फोन करून फ्लॅटवर बोलावले होते. मीतू जेव्हा फ्लॅटवर पोहोचली तोपर्यंत रिया तेथून निघून गेली होती. मीतूने सांगितल्याप्रमाणे, ती सुशांतसोबत 12 पर्यंत होती. पण, लहान मुले तिच्या घरी असल्याने तिला निघावे लागले. तर रियाचा दावा होता की 8 जुलै रोजी असे घडलेच नाही. तिने वकिलांच्या माध्यमातून दावा केला की मृत्यूपूर्वी सुशांत अस्वस्थ होता. तो वारंवार रडत होता आणि त्याच्या कुटुंबियांना त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलवत होता. 8 जून रोजी सुशांतची बहीण राहण्यासाठी आली तेव्हा सुशांतने रियाला घर सोडण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...