आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया कपूरने केली नवीन चित्रपटाची केली घोषणा:'द क्रू'मध्ये एकत्र दिसणार करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बू लवकरच 'द क्रू' या नवीन चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्माती रिया कपूर हिने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. यासोबतच या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असल्याचेही तिने सांगितले आहे.

मी तुमच्यासमोर माझी ड्रीम कास्ट सादर करत आहे - रिया

ही पोस्ट शेअर करत रियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तीन वर्षांचे स्वप्न, लेखन, नियोजन केल्यानंतर मी एकता कपूरसह आमची ड्रीम कास्ट व्होग इंडियाच्या नोव्हेंबरच्या कव्हर पेजवर सादर करत आहे. तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन स्टारर 'द क्रू'चे शूटिंग फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. राजेश कृष्णन याचे दिग्दर्शन करणार आहेत. निधी मेहरा आणि मेहुल सुरी यांनी त्याची पटकथा लिहिली आहे.'

हा चित्रपट 'वीरे दी वेडिंग'चा सिक्वेल नाही: करीना
'द क्रू'च्या घोषणेनंतर एका मुलाखतीत बोलताना करीना कपूर म्हणाली, 'रिया कपूरसोबत 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात काम करताना खूप मजा आली होती. यावेळी ती माझ्याकडे या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आली जी मला खूप आवडली. या चित्रपटाची कथा खूप चांगली असून हा चित्रपट कॉमेडी ड्रामाने परिपूर्ण असणार आहे. या चित्रपटासाठी रिया कपूरने तब्बू आणि क्रिती सेनॉनला कास्ट केले आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 'वीरे दी वेडिंग'चा सिक्वेल नाही,' असे करीनाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...