आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूली वेड्स:मालदीवमध्ये पती करणसोबत हनिमून साजरा करतेय रिया कपूर, फोटो शेअर करत दाखवली ट्रिपची झलक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल कपूर यांच्या जुहूस्थित निवासस्थानी झाले होते लग्न

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर पती करण बूलानीसोबत सध्या मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे त्यांच्या या ट्रिपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. रियाने मालदीवमधील दोघांचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 14 ऑगस्ट रोजी मुंबईत एका खासगी समारंभात दोघांनी लग्न केले होते.

रिया आणि करण मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत
रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टोरीवर अनेक बूमरँग व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तिने बिकिनी आणि श्रगसह चष्मा घातलेला दिसतोय. त्याचबरोबर पती करण बूलानी तिच्यासोबत दिसतोय. करणनेही या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

अनिल कपूर यांच्या जुहूस्थित निवासस्थानी झाले होते लग्न

रियाने 14 ऑगस्ट रोजी तिचा प्रियकर आणि चित्रपट निर्माता करण बूलानीशी लग्न केले. अनिल कपूरच्या जुहू येथील निवासस्थानी हे लग्न झाले. कारण रियाने तिच्या घराच्या लिव्हिंग रुममध्ये लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते. अतिशय साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. या लग्नात कुटुंबीय आणि नातेवाईकांसह जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नाच्या दुस-या दिवशी अनिल कपूर यांनी रिसेप्शन पार्टी देखील आयोजित केली होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...