आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात दाक्षिणात्य अभिनेत्री पायल घोष हिने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मात्र पायलने एका व्हिडिओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना अभिनेत्री रिचा चड्ढा हिचे देखील नाव घेतले होते. परिणामी संतापलेल्या रिचाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणार आपले नाव ओढल्याबद्दल रिचा चड्ढाने पायलला कायदेशीर नोटीस पाठविली. रिचाने पायल घोषसह केआरके म्हणजे कमल आर खान आणि एका वृत्तवाहिनीवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात असून रिचाने 1.1 कोटींची नुकसान भरपाई देखील मागितली आहे.
याप्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे
रिचाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तिसर्या व्यक्तीविरूद्ध केलेल्या दाव्यांमध्ये माझे नाव ओढले गेले आहे. यासोबतच रिचाने अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटी आणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पायल घोषच्या वतीने कोणीही हजर झाले नाही. यानंतर उच्च न्यायालयाने रिचाला नवीन नोटीस पाठविण्यास सांगितले आहे. या खटल्याची सुनावणी 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत स्थगित करण्यात आली असून कोर्टाने कागदपत्रे परत आणण्यास सांगितले आहे.
पायलने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, अनुरागने तिला सांगितल्यानुसार, रिचा चड्ढा, माही गिल, हुमा कुरैशी हे कलाकार माझ्या एका शब्दावर हवं तेव्हा माझ्याकडे येतात. आणि अनुरागला पायलकडूनही हीच अपेक्षा होती.
पायल म्हणाली - मला रिचा चड्ढाशी काहीही घेणदेणं नाही
आता पायलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. 'मला रिचा चड्ढाशी काही देणघेणं नाही. मी तिच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. तिची नेमकी काय समस्या आहे मला माहित नाही. मी तेच बोलले जे मला अनुरागने सांगितले होते. आम्ही या प्रकरणावर कायदेशीर उत्तर देऊ,' असे पायल म्हणाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.